Maharashtra Shahir : बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमाचं नवं पोस्टर आऊट

केदार शिंदेंच्या (Kedar Shinde) 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Maharashtra Shahir : बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमाचं नवं पोस्टर आऊट

केदार शिंदेंच्या (Kedar Shinde) ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाचं नवं पोस्टर आऊट झालं आहे. या सिनेमात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chauhan) यांच्या भूमिकेत अतुल काळे (Atul kale) दिसणार आहेत.

‘महाराष्ट्र शाहीर’ हा बहुचर्चित सिनेमा २८ एप्रिल २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि केदार शिंदे प्रोडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे.

आज यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे खास पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. पोस्टर शेअर करत केदार शिंदेंनी लिहिलं आहे,”संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पार पडल्यावर महाराष्ट्राचा मंगल कलश घेऊन आले असे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण”. केदार शिंदेंनी पुढे लिहिलं आहे,”जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत ज्यांच्या समोर पहिल्यांदा सादर झालं असं धोरणी व्यक्तिमत्त्व यशवंतराव चव्हाण…हे सारं असूनही शाहीर साबळे आणि यशवंतराव चव्हाण यांचं नातं राजकारण्याच्याही पलिकडचं होतं…हेच नातं उलगडणार २८ एप्रिल २०२३ रोजी ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमात…आज यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे खास पोस्टर…यशवंतरावांच्या भूमिकेत आहेत अतुल काळे”.

‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमात अभिनेता अंकुश चौधरी मुख्य भूमितेत आहे. सिनेमात अंकुश शाहीर साबळेंच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमासाठी अंकुश खूप मेहनत घेत आहे. काही दिवसांपूर्वी केदार शिंदेंनी अंकुश चौधरीचा शाहीर साबळेंची वेशभूषा साकारतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.

हे ही वाचा:

Amol Kolhe : अमोल कोल्हेंचं ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज

Nikita Rawal : ‘गरम मसाला’ अभिनेत्री निकिता रावलने समुद्रकिनाऱ्यावर दाखवला बोल्ड अंदाज

Drishyam 2 : ‘दृश्यम-2’ चा बॉक्स ऑफिसवर धमाक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version