spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mahesh Bhatt : प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांचे गाजलेले वाद

बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक “महेश भट्ट” यांचा २० सप्टेंबर रोजी ७४ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. “महेश भट्ट ” प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून खूप चर्चेत असतात. महेश भट्ट यांनी बॉलीवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत्त. तसेच ते चित्रपटामुळे आणि इतरही कारणामुळे चर्चेत असतात. प्रोफेशनल लाईफ आणि वैयक्तिक लाईफमध्ये त्यांचे भरपूर वाद झाले आहे. त्यामुळे ते अनेकदा वादात सापडले आहेत. महेश भट्ट यांचे जीवन वादग्रस्तांनी नेहमी भरलेले असायचे. तसेच त्यांचे वडील नाना भट्ट ब्राहमण होते आणि त्यांची आई शिरीन मोहम्मद ही मुस्लिम होती. त्यामुळे त्यांची टिका होत असताना दिसत आहे. तर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही गोष्टी जाणून घेऊया .

हे ही वाचा : अभिनेता अजय देवगणची मोठी घोषणा

 

महेश भट्ट कॉलेज लाईफमध्ये असताना लॉरियन ब्राईट या मुलीवर त्यांचे पहिले प्रेम झाले होते. त्यांनी तिचासोबत लग्नाची गाठ बांधली होती. लग्नानंतर लॉरियन ब्राईट हिचे नाव किरण भट्ट ठेवण्यात आले होते. तसेच किरण भट्ट ही पूजा भट्ट आणि राहुल भट्ट यांची आई आहे. त्याचवेळी महेश भट्ट यांचे परवीन बाबीसोबत अफेर होते. त्यामुळे त्यांचे लॉरियन ब्राईट सोबतचे संबंध बिघडले होते. त्यानंतर त्यांनी परवीन बाबीसोबत लग्न केले आणि ते दोघे लग्नानंतर एका लिविंगरूम मध्ये राहायचे. परवीन बाबी आणि महेश भट्ट हे दोघे एकमेकांच्या प्रेमात वेडे होते. पण जेव्हा महेश भट्ट यांना कळले की परवीनला स्किझोफ्रेनिया नावाचा आजार आहे. त्यामुळे तिला कोणीतरी मारले, असे तिला वेगळे वेगळे भ्रम व्हायचे यामुळे महेश भट्ट यांचे परवीन सोबतचे संबंध बिघडले होते. महेश भट्ट यांनी तिला घटस्फोट द्यायचे ठरवले. त्यामुळे ते एकमेकांपासून लांब जाऊ लागले आणि त्यानंतर परवीन हिचा मृत्यू झाला.

परवीन हिच्या मृत्यूनंतर महेश भट्ट यांच्या लाईफमध्ये सोनी राजदान आली. त्यांचे प्रेम प्रकरण चालू झाले. किरण सोबत घटस्फोट न घेता त्यांनी सोनी राजदान सोबत लग्न केले. त्यासाठी त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. तसेच महेश भट्ट आणि सोनी राजदान यांना आलिया आणि शाहीन अश्या दोन मुली आहेत.

हे ही वाचा :

नारायण राणेंना मुंबई हाय कोर्टाचा मोठा धक्का

 

Latest Posts

Don't Miss