मकरंद अनासपुरेंचा ‘हा’ नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस

दिवाळी येताच अनेकांना लग्न सराईचे वेध लागतात. यंदाची लग्नसराई आपल्या सर्वांसाठी विशेष असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके अभिनेते मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure) आणि मिश्कील विनोदाचे बादशहा विजय पाटकर (Vijay Patkar) वाजंत्र्यांसोबत सगळ्या वऱ्हाडाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. यजमान

मकरंद अनासपुरेंचा ‘हा’ नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस

दिवाळी येताच अनेकांना लग्न सराईचे वेध लागतात. यंदाची लग्नसराई आपल्या सर्वांसाठी विशेष असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके अभिनेते मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure) आणि मिश्कील विनोदाचे बादशहा विजय पाटकर (Vijay Patkar) वाजंत्र्यांसोबत सगळ्या वऱ्हाडाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. यजमान कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांनी या सोहळ्याचा घाट घातला असून, मनोरंजनाची ट्रीट देण्यासाठी ते स्वराज फिल्म प्रॉडक्शन निर्मित मल्टीस्टारर ‘वऱ्हाडी वाजंत्री’ (Varhadi Vajantri) हा चित्रपट घेऊन या लग्न सराईत अवतरणार आहेत. मनोरंजनाचा मोठा डोस असलेल्या या चित्रपटाची अधिकृत घोषणा मोशन पोस्टरद्वारे सोशल मीडियावर करण्यात आली आहे.

कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्या स्वराज फिल्म प्रॉडक्शन निर्मित आणि लोकप्रिय अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर दिग्दर्शित मल्टीस्टारर मराठी कौटुंबिक विनोदी ‘वऱ्हाडी वाजंत्री’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त पक्का झाला आहे. लवकरच लगीनसराई सुरु होत असल्याने विजय पाटकर आपल्या सवंगड्यांसोबत रसिकांसाठी विनोदाचा हा बंपर आहेर घेऊन चित्रपट मंडपाच्या उंबऱ्यावर उभे आहेत. त्यांच्यासोबत प्रेक्षकांच्या स्वागतासाठी विनोदाचा हुकमी एक्का मकरंद अनासपुरे यजमान म्हणून मिरवणार असून, पॅडी कांबळे आणि हेमांगी कवी या छुईमुई जोडीला बोहल्यावर चढवण्यासाठी ते उतावीळ झाले आहेत.

वैभव अर्जुन परब लिखित ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेल्या मकरंद अनासपुरेंसोबत अभिनेते मोहन जोशी, रीमा लागू, पंढरीनाथ कांबळी, हेमांगी कवी, विजय कदम, प्रिया बेर्डे, जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, सुनील गोडबोले, पूर्णिमा अहिरे, गणेश रेवडेकर, प्रभाकर मोरे, राजेश चिटणीस, प्रशांत तपस्वी, विनीत बोंडे, शिवाजी रेडकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहपुरे, साक्षी परांजपे इत्यादी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ‘वऱ्हाडी वाजंत्री’ हा चित्रपट ११ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा म्हणाले, एकीकडे शेतकऱ्याचे जीवन कर्ज, दुःखाने भरलेले, तर दुसरीकडे…

आमच्या नेत्यांना काही बोललेलं खपवून घेणार नाही – नारायण राणे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version