Malaika Arora Father Death: मलायकाच्या वडिलांचे नाव नेमके काय? दोघांच्या वयातील अंतर पाहून व्हाल चकित…

Malaika Arora Father Death: मलायकाच्या वडिलांचे नाव नेमके काय? दोघांच्या वयातील अंतर पाहून व्हाल चकित…

Malaika Arora Father Death: अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी काल स्वतःचं आयुष्य संपवल्याची मोठी बातमी समोर आली होती. त्यामुळे अरोरा कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मलायकाच्या वडिलांनी स्वतःचे आयुष्य संपवल्यामुळे बॉलिवुडमध्ये खळबळ माजली आहे. घडलेल्या सर्व प्रकाराचा शोध पोलीस घेत आहेत. मलायकाच्या वडिलांच्या निधनाची चर्चा सर्वत्र रंगत आहे.

परंतु मलायकाच्या वडिलांची बातमी समोर आली तेव्हा त्याचं नाव अनिल अरोरा असल्याचं समोर आलं. मात्र, पोलिसांनी मलायकाच्या वडिलांचा अनिल मेहता म्हणून उल्लेख केला. त्यानंतर स्वतः मलायकाने वडिलांच्या निधनानंतर एक पोस्ट शेअर केली, त्यात वडिलांच्या नावाचा उल्लेख अनिल मेहता असा केला आहे.

अनिल मेहता हे मलायकाचे सावत्र वडील होते?

रिपोर्टनुसार, अनिल मेहता हे मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांचे खरे वडील नसून सावत्र वडील होते. मलायका आणि अनिल मेहता यांच्या वयात देखील ११ वर्षांचे अंतर होते. अनिल मेहता यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९६२ मध्ये झाला होता, तर मलायकाचा जन्म २३ ऑक्टोबर १९७३ मध्ये झाला.

मलायकाची वडिलांसाठी भावूक पोस्ट

अभिनेत्री मलायका अरोरा वडिलांच्या निधनानंतर पोस्ट शेअर करत म्हणाली, “तुम्हा सर्वांना सांगताना दुःख होत आहे की, एक मृदू आत्मा, एक अद्भुत आजोबा, एक प्रेमळ पती आणि सर्वांचे सर्वात चांगले मित्र असलेले आमचे वडील अनिल मेहता यांचं निधन झालं आहे. आमच्या कुटुंबाला सध्या मोठा धक्का बसला आहे. आम्ही सर्व मीडिया आणि शुभचिंतकांकडून गोपनीयतेची विनंती करतो. सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.”

घटनेची माहिती मिळताच अभिनेता अर्जुन कपूर, अभिनेत्री करीना कपूर, अभिनेत्री करिश्मा कपूर, अभिनेता अरबाज खान, सलमान खान, सोहैल खान आणि संपूर्ण खान कुटुंब देखील मलायकाच्या घरी पोहोचले. सध्या त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारायल होत आहेत. त्यावर बरेच जण कमेंटद्वारे मलायकाच्या वडिलांना श्रद्धांजली वाहत आहेत.

हे ही वाचा:

Jal Jeevan Mission व Swachh Bharat Mission ची अंमलबजावणी करण्याच्या Gulabrao Patil यांच्या सूचना

देशविरोधी बोलण्याची Rahul Gandhi आणि Congress ची सवय, राहुल गांधींच्या आरक्षणावरील वक्तव्यावरून Amit Shah यांची टीका

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version