Wednesday, September 4, 2024

Latest Posts

Malaika Arora पुन्हा एकदा चर्चेत, कोण आहे हा मिस्ट्री मॅन?

एकीकडे ब्रेकअपच्या चर्चा चालू असताना दुसरीकडे मलायका स्पेनमध्ये तिच्या व्हेकेशनसाठी गेली आहे. तिच्यासोबत यावेळी एक मिस्ट्री मॅन दिसल्याने सर्व चर्चांना एक वेगळे रूप आले आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांच्या ब्रेकअपच्या बातम्या तर बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या ब्रेकअपच्या अफवांमध्ये मलायका आणि अर्जुनने अनेक पोस्टही शेअर केल्या आहेत. मात्र, दोघांनीही आतापर्यंत त्यांच्या ब्रेकअपबद्दल उघडपणे भाष्य केलेले नाही. एकीकडे ब्रेकअपच्या चर्चा चालू असताना दुसरीकडे मलायका स्पेनमध्ये तिच्या व्हेकेशनसाठी गेली आहे. तिच्यासोबत यावेळी एक मिस्ट्री मॅन दिसल्याने सर्व चर्चांना एक वेगळे रूप आले आहे.

मलायकाने १९९८ मध्ये अभिनेता अरबाज खान सोबत लग्न केले होते. त्यानंतर २०१७ मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला. त्यानंतर मलायका आणि अर्जुन कपूरच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या. आता मात्र काही वेगळ्याच चर्चा सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. मलायकाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या स्पेनमधील काही फोटोंचा कोलाज बनवून शेअर केला आहे. या फोटोंमध्ये एक मिस्ट्री मॅन हातात ज्यूसचा ग्लास घेतलेला दिसत आहे. तर दुसर्‍यामध्ये मलायका निऑन रंगाची बिकिनी परिधान करून मस्ती करताना दिसत आहे. एका फोटोत खाद्यपदार्थ दिसत आहेत. आणि एका फोटोत व्हाईट रंगाचा शर्ट परिधान केलेली व्यक्ती दिसत आहे.

नुकताच पार पडलेल्या अनंत आणि राधिकाच्या शाही विवाह सोहळ्याला संपूर्ण बॉलीवूडने हजेरी लावली होती. मात्र, या शाही विवाह सोहळ्यात मलायका अरोरा दिसली नाही. अनंत आणि राधिकाच्या लग्नाला अर्जुन कपूर एकटाच आला आहे. अर्जुन कपूरने एकट्यानेच हजेरी लावल्यामुळे चर्चेत असलेला हा विषय अजूनच रंगला आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर आता वेगळे झाले आहेत. त्या दोघांनीही यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या दिवशी मलायकाने केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत होती. मलायकाच्या या पोस्टमुळे तिच्या आणि अर्जुनच्या ब्रेकअपचं कारण सर्वांसमोर आल्याचं म्हटले जात आहे. अर्जुन कपूरने मागील महिन्यात त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने अर्जुनच्या घरीही पार्टीचं आयोजन करण्यात आले होते. अनेक बॉलिवूड कलाकारांनीही उपस्थिती लावली त्यात मलायका मात्र नव्हती.

हे ही वाचा:

IAS Pooja Khedkar ची आई Manorama Khedkar ला अरेरावी भोवली, महाडमधून पोलिसांच्या ताब्यात

Google आणि MeitY केली हातमिळवणी!, एकत्र येऊन भारतीय स्टार्टअप्समध्ये AI ची वाढवणार ताकद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss