spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मलायका आणि  रितेश देशमुखने ठाण्यातील व्हायरल व्हिडिओवर व्यक्त केला संताप,मुख्यमंत्र्यांकडे केली कारवाईची मागणी

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला चुकीच्या किंवा चांगल्या अश्या दोन्ही गोष्टींकरिता व्यक्त होण्याचं उत्तम साधण प्राप्त झालं आहे.

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला चुकीच्या किंवा चांगल्या अश्या दोन्ही गोष्टींकरिता व्यक्त होण्याचं उत्तम साधण प्राप्त झालं आहे.दरम्यान सोशल मीडियावरुन अनेक व्हिडिओ किंवा फोटो हे व्हायरल होत असतात. अशातच आता ठाण्यातील पाळीव प्राण्यांच्या क्लिनिकमध्ये श्वानांना मारहाण होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर अनेक कलाकारांनी रोष व्यक्त केला आहे.यामध्ये मलायका अरोरा,रितेश देशमुख आणि जुई गडकरीने सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.

ठाण्यातील आर मॉलजवळ असणाऱ्या वेटिक पेट क्लिनिकमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याठिकाणी ग्रुमिंगसाठी आणण्यात आलेल्या एका श्वानाला क्लिनिकमधील दोन कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केली. या प्रकरणाचा व्हिडीओ सगळीकडे चांगलाच व्हायरल झाला आणि त्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली. 

अभिनेत्री मलायकाने श्वानाला मारहाण करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. हा प्रकार अतिशय संतापजनक असल्याचे तिने म्हटले.  या केंद्रावरही कारवाई झाली पाहिजे असेही तिने म्हटले.

अभिनेता रितेश देशमुखने या व्हिडीओवर संताप व्यक्त केला.रितेश देशमुखने हा व्हिडीओ शेअर करत श्वानाला मारहाण करणाऱ्या  कर्मचाऱ्याला अटक करण्याची मागणी केली. रितेशने इन्स्टा स्टोरीवर श्वानाच्या मारहाणीचा व्हिडीओ शेअर केला होता.

अभिनेत्री जुई गडकरीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत घडल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. जुई गडकरीने म्हटले की, हा प्रकार संतापजनक आहे. मी तो व्हिडीओ पूर्ण पाहू शकले नाही. श्वानाला मारहाण करणाऱ्याला देव नक्कीच शिक्षा करेल. ”ज्या हाताने त्याने मुक्या जीवाला मारहाण केली ते हात काही दिवसांनी कामच करणार नाहीत…. कृपया हा अत्याचार थांबवा आणि त्या कर्मचाऱ्याला अटक करून कठोर शिक्षा द्या. तो श्वान सुरक्षित असू देत…. आपल्या श्वानाला, प्राण्याला अशा क्लिनिकमध्ये एकटे पाठवू नका असे आवाहनही तिने केले. 

प्राणिप्रेमींनी  संताप व्यक्त केल्यानंतर आणि घडल्या प्रकाराची तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर ठाणे पोलिसांनी या प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. तर, ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या वेटिक पेट क्लिनिकने कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. हा प्रकार आमच्यासाठी धक्कादायक असल्याचे क्लिनिकच्यावतीने सांगण्यात आले आहे. 

हे ही वाचा: 

Ganpat Gaikwad यांना पहाटेच उल्हासनगर चोपडा कोर्टात केले हजर, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

‘सगळ्या टाकाऊ गोष्टी सामावून घेत’…किरण मानेंची महाराष्ट्राच्या राजकारणावर बोचक टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss