मलायका अरोराच्या वडिलांनी संपवले स्वतःचे जीवन; अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर

मलायका अरोराच्या वडिलांनी संपवले स्वतःचे जीवन; अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यावर वडिलांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मलायकाचे वडील अनिल अरोरा (Anil Arora) यांनी उंच इमारतीवरून उडी मारून स्वतःचे जीवन संपवले.
अनिल अरोरा यांच्या टोकाच्या निर्णयामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. घडलेल्या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली असून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या अनिल अरोरा यांचे पार्थिव वांद्रे येथील डॉ. भाभा हॉस्पिटलमध्ये (Dr. Homibhabha Hospital, Bandra) ठेवण्यात आले आहे. घटनास्थळी मलायका अरोराचा पूर्व पती आणि अभिनेता अरबाज खान ( Arbaaz Khan) हा सुध्दा अरोरा कुटुंबासोबत असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईतल्या वांद्रे येथील अल्मेडा पार्क या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समजली आहे. सगळीकडे खळबळ उडाल्यामुळे घटनास्थळी पोलिसांनी त्वरित धाव घेतली. पोलिसांना त्या ठिकाणी कोणतीही सुसाईड नोट ( Suicide Note) मिळाली नाही. तरीही सदर प्रकरणात पोलिसांचा शोध सुरू असून आत्महत्येमागील कोणत्याही प्रकारचे ठोस कारण समोर आलेलं नाही. अनिल अरोरा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.a

सध्या मलायका अरोरा काही कामानिमित्त पुण्याला (Pune) गेली होती परंतु घटनेबाबत माहिती मिळताच ती मुंबईकडे (Mumbai) रवाना झाली आहे. मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा हे पंजाबी (Punjabi) हिंदू कुटुंबातील होते. त्यांचे कुटुंब भारताच्या सीमेवर वसलेल्या फाजिल्का (Fazilka) येथील रहिवासी होते. अनिल अरोरा यांनी इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये (Indian Merchant Navy) काम केले होते. अनिल अरोरा यांनी मल्याळी ख्रिश्चन कुटुंबातील जॉयस पॉलीकार्पशी लग्नगाठ बांधली. मात्र अभिनेत्री मलायका अरोरा अकरा वर्षांची असताना अनिल अरोरा आणि जॉयस यांचा घटस्फोट झाला असल्याचे मलायकाने आपल्या एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते.

हे ही वाचा:

नागपूर अपघातप्रकरणावरून मविआ नेत्यांमध्येच जुंपली; ठाकरे गटाच्या Sushma Andhare आणि काँग्रेसचे Vikas Thakre यांच्यात नवा वाद

जर Mahavikas Aghadi चे सरकार आलं तर सगळ्या योजना बंद पडतील: Chandrashekhar Bawankule

Exit mobile version