spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mamta Kulkarni अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या ‘या’ याचिके संदर्भातील कागतपत्रे पुन्हा बनवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

अभिनेत्री ममता कुल्कर्णीवर (Mamta Kulkarni ) अमली पदार्थाच्या तस्करी करण्याचा गुन्हा २०१६ साली दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर बरीच वर्ष हा खटला न्यायालयात सुरु होता. पण अलीकडेच अभिनेत्री ममता कुलकर्णीने तिच्यावर असलेला अमली पदार्थाच्या तस्करी करण्याचा गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली होती. पण चार वर्ष जुन्या केसचे कागदपत्र गहाळ झाले असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाला खटला सुरु असताना देण्यात आली होती. त्यामुळे अनेकवेळा सुनावणी पुढेही ढकलण्यात आली. पण आता मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणा संदर्भातील कागदपत्रे पुन्हा तयार करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

सहा वर्षांपूर्वी अभिनेत्री ममता कुल्कर्णीवर (Mamta Kulkarni ) अमली पदार्थाच्या तस्करी करण्याचा गुन्हा ठाणे पोलिसांकडून दाखल करण्यात आला होता . एप्रिल २०१६ मध्ये ठाणे पोलिसांना चौकशी दरम्यान दोन गाड्यांमध्ये अमली पदार्थ आढळली होती. त्यावेळेस पोलिसांनी चालक आणि त्याच्या सहकारी साथीदाराला ताब्यात घेतले नंतर चौकशी दरम्यान अजून १० जण या तस्करीत शामिल असल्याचे उघड झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपीं पैके एका आरोपीने सांगितले की त्यांनी मोम्बासा येथील एका हॉटेलमध्ये या तस्करीसाठी बैठक घेतली होती. त्या बैठकीत अभिनेत्री ममता कुल्कर्णीही उपस्थित होती. त्या आरोपीच्या विधानाची पोलिसांनी नोंद केली आणि ममता कुलकर्णीला अटक केली होती. त्यानंतर ममता कुलकर्णींवर न्यायालयीन खटला सुरुआहे .

ममता कुलकर्णीने अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) त्यांच्यावर असलेलय तस्करीचा गुन्हा रद्द करण्याची याचिका दाखल केली आहे. अभिनेत्री ममता कुलकर्णीने उच्चन्यायालयातील याचिकेत असे नमूद केले आहे की तिच्यावरील आरोप “केवळ सहआरोपींच्या विधानावर आधारित आहेत” आणि “कोणत्याही स्वरूपाचे कोणतेही पुरावे नाहीत.” पण तिच्यावर गेली अनेक वर्ष सुरु असलेल्या याचिकेची कागद पत्रे गहाळ झाली आहेत. त्यामुळे दोन वेळा उच्च न्यायालयाने तिची याचिका रद्द केली आहे. पण यावर ‘पोलिसांनी सर्व पक्षकारांच्या मदतीने पुन्हा कागदपत्र तयार करून पुढच्या सुनावणीला न्यायालयासमोर सादर करावेत.’ उच्च न्यायालयाने असे आदेश पोलिसांना जरी केले आहेत.

हे ही वाचा : 

Asaduddin Owaisi असुद्दीन ओवेसींनी भारत-चीन वादावरून केंद्रावर ताशेरे ओढत म्हणाले, भारताकडे चांगले सैनिकी बळ आहे पण पंतप्रधान…

Indian Air Force exercise भारत-चीन संघर्षादरम्यान आजपासून लढाऊ विमानांची LAC वर गर्जना, हवाई दलाचा युद्धाभ्यास सुरु

Sumeet Pusavale बाळूमामा ‘फेम’ सुमित पुसावळे अडकले लग्न बंधनात, पहा लग्नाचे फोटो

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss