Man Dhaga Dhaga Jodte Nava: स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Man Dhaga Dhaga Jodte Nava: स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Man Dhaga Dhaga Jodte Nava: स्टार प्रवाह वाहिनीवरील (Star Pravah) सर्वच मालिका सध्या खूपच लोकप्रिय आहेत. त्यातीलच लोकप्रिय मालिका म्हणजे ‘मन धागा धागा जोडते नवा’. (Man Dhaga Dhaga Jodte Nava) या मालिकेवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील अनेक लोकप्रिय मालिकांपैकी ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही मालिका सुद्धा तितकीच लोकप्रिय आहे. पण या मालिकेविषयी सध्या सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगत आहे. ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेमध्ये सार्थकच्या मुख्य भूमिकेत अभिषेक रहाळकर (Abhishek Rahalkar) व आनंदीच्या भूमिकेत दिव्या पुगावकर (Divya Pugaonkar) ही जोडी आहे.

सार्थक आणि आनंदीची ही लग्नानंतरची प्रेमकहाणी पाहण्यासाठी चाहते आवर्जून ही मालिका बघतात. अजूनपर्यंत या मालिकेने ५०० भागांचाही टप्पा घातलेला नाही. मात्र, सोशल मीडियावर ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा रंगत आहे. marathiserials_official या इन्स्टाग्राम पेजवरुन ‘मन धागा धागा जोडते नवा’ ऑफ एअर (Off-Air) होणार असण्याविषयी पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेबद्दल बंद होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मालिका बंद होण्याच्या चर्चेवर प्रेक्षकांनी विविध प्रतिक्रियांसह नाराजी व्यक्त केली आहे.

काही महिन्यांपूर्वी हा मालिकेत सुखदा या नवीन पात्राची एन्ट्री झाली होती. सुखदा हे पात्र अभिनेत्री मयुरी देशमुखने (Mayuri Deshmukh) साकारले आहे. या मालिकेतील हा लव्ह ट्रँगल सुद्धा प्रेक्षकांना फार आवडला. त्याचबरोबर टीआरपी रेटिंगमध्ये पण ही मालिका टॉप १० मध्ये होती. तरी असे असतानाही ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा रंगली आहे. स्टार प्रवाहवर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत त्यामुळे ही मालिका बंद होणार असल्याचे बोलले जात आहे. ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही मालिका सध्या संध्याकाळी ६.३० वाजता सोमवार ते शनिवार प्रेक्षकांना दिसत आहे.

महायुतीत शिंदे गट आणि अजित पवार गट दोघेही आश्रित, भाजपचे तुकडे त्यांना स्वीकारावे लागतील: Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version