‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत रंगणार ‘मंगळागौर’

कलर्स मराठी (colors marathi) या वाहिनीवरील 'भाग्य दिले तू मला' (Bhagya Dile Tu Mala) या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत रंगणार ‘मंगळागौर’

कलर्स मराठी (colors marathi) या वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ (Bhagya Dile Tu Mala) या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. श्रावण महिना चालू झाली कि सर्व ठिकाणी सणांची चाहूल लागते. तसेच प्रत्येक प्रेक्षक वर्गाला या सर्व गोष्टी मालिकांमध्येही बघायला आवडतात. ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेच्या आगामी भागात रत्नमाला मोहिते मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी करताना दिसणार आहे. रत्नामाला मोहितेला मंगळागौर खेळताना पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

श्रावण सुरू झाल्यावर येणारे श्रावणी सोमवार, महादेवाची पूजा, पण त्यातही मंगळागौर म्हटलं की, महिलांचा विशेष उत्साह दिसून येतो, कारण मंगळागौर हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. आणि त्यातच आता मालिकांमध्येही मंगळागौर हि मोठ्या प्रमाणात दाखवली जात आहे. मालिकेत मंगळागौर साजरी करण्यात येणार आहेच, परंतू सानिया मात्र या आनंदाच्या क्षणात मिठाचा खडा टाकणार आहे. रत्नमाला मोहित आणि कावेरीला कसं दूर करता येईल याचा कट रचणार आहे.

‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत मंगळागौरीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या कावेरीने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे, साजेसे असे दागदागिने देखील परिधान केले आहेत. सगळ्याच महिलांनी पारंपारिक नऊवारी साडी नेसली आहे. कावेरी इतर महिलांसोबत मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहे. मंगळागौरीची पारंपरिकरित्या पूजा करण्यात येणार आहे. मंगळागौरीची पूजा पार पडते आणि त्यानंतर खेळांना सुरुवात होते. पण, याच उत्साहाच्या वातावरणात आता कोणता नवा ट्विस्ट येणार? काय घडणार? हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे. ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेचा मंगळागौर विशेष भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हे ही वाचा :-

अखेर बिपाशा बासूने चाहत्यांना दिली गुड न्युज

सत्ता आली म्हणजे मस्ती आली का? अजित पवारांचा राज्य सरकारला सवाल

Exit mobile version