spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मणिरत्नमचा Ponniyin Selvan 2 नव्या वर्षाच्या ‘या’ तारखेला होणार रिलीज

चित्रपटाचा शेवट एका क्लिफहॅंजरवर झाला आणि आता सर्वांच्या नजरा चित्रपटाच्या दुसऱ्या भागाकडे लागल्या आहेत.

दिग्दर्शक मणिरत्नम यांचा पोन्नियिन सेल्वन: भाग १ यशाच्या शिखरावर पोहोचला आहे, जो ३० सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. चित्रपटाचा शेवट एका क्लिफहॅंजरवर झाला आणि आता सर्वांच्या नजरा चित्रपटाच्या दुसऱ्या भागाकडे लागल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, Ponniyin Selvan: Part 2 २८ एप्रिल २०२३ रोजी थिएटरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तथापि, रिलीजच्या तारखेबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळालेले नाही.

PONNIYIN SELVAN भाग 2 एप्रिल २०२३मध्ये रिलीज होणार आहे?

Ponniyin Selvan च्या पहिल्या भागाने जगभरात ४५० कोटींहून अधिक कमाई केली आणि अजूनही जगभरातील निवडक चित्रपटगृहांमध्ये त्याचे प्रदर्शन सुरू आहे. हा चित्रपट एक मोठा ब्लॉकबस्टर ठरला. सध्या,पोन्नियिन सेल्वन: भाग २ पोस्ट-प्रॉडक्शन टप्प्यात आहे. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी उन्हाळ्याच्या सुटीत रिलीज होण्याची शक्यता आहे. जर सर्व काही योजनेनुसार झाले तर, पोनियिन सेल्वन एप्रिलमध्ये रिलीज होईल.

पोन्नियिन सेल्वन : भाग १ च्या प्रमोशन दरम्यान, मणिरत्नम यांनी उघड केले की दुसरा भाग पहिला भाग रिलीज झाल्यानंतर सहा ते नऊ महिन्यांनी प्रदर्शित होईल. कल्की कृष्णमूर्ती यांनी लिहिलेल्या त्याच नावाच्या लोकप्रिय तमिळ साहित्यिक कादंबरीवर पोनियिन सेल्वन आधारित आहे. या चित्रपटात चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, त्रिशा, कार्ती आणि जयम रवी यांच्या प्रमुख भूमिकांसह प्रकाश राज, जयराम, सरथकुमार, प्रभू, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला आणि विक्रम प्रभू सहाय्यक भूमिकेत असतील. चित्रपटाचे संगीत ए आर रहमान यांनी दिले आहे.

हे ही वाचा:

ज्या प्रकारे त्यांची प्रकरणे बाहेर येत आहेत, यांना भाजप तर टाचणी लावत नाही ना? उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला सवाल

तब्बल दोन वर्षांनंतर मुंबईत चार दिवस रंगणार Mandeshi Mahotsav

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss