spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘या’ मराठी कलाकारांचा लंडनच्या रस्त्यावर ‘हेराफेरी’ परफॉर्मन्स…

सध्या मराठी कलाकार हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घडमोडी ते सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांशी कनेक्टेड राहत असतात. तर, कधी कधी धमाल व्हिडीओ शेअर करून ते प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू देखील आणतात.

सध्या मराठी कलाकार हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घडमोडी ते सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांशी कनेक्टेड राहत असतात. तर, कधी कधी धमाल व्हिडीओ शेअर करून ते प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू देखील आणतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. या धमाल व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

‘लंडन मिसळ’ या मराठी चित्रपटाची काही महिन्यांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून या चित्रपटातील कलाकार चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी कलाकार लंडमध्ये आहेत आणि तेथे त्यांचा चांगला वेळ आहे. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी शेअर करत असतात. नुकताच अभिनेता भरत जाधव (Bharat Jadhav), निखिल चव्हाण, गौरव मोरे यांचा एक प्रँकचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सगळ्यांना हसवतोय. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेता भरत जाधव, निखिल चव्हाण (Nikhil Chavan) , गौरव मोरे (Gaurav More) लंडनमध्ये दिसत आहेत. तिन्ही कलाकार ‘फिर हेराफेरी’ (Phir Hera Pheri) चित्रपटातील ‘ए मेरी जोहराजबी’ (Ai Meri Zohrajabeen) या गाण्यावर थिरकत आहेत. त्याचा हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिघांचाही असा मजेशीर अंदाज पाहून चाहते खूप खूश आहेत. व्हिडिओवर भरपूर लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikkhhil Chavaan (@nikkhhil_29)

 ‘लंडन मिसळ’ (London Misal) या चित्रपटाच्या शूटिंगमधून थोडासा वेळ काढून हे कलाकार सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांना लंडनची झलक दाखवत असतात. मात्र, त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओने चाहत्यांना हसता हसता आठवणींमध्ये रमायला लावलं आहे. ‘ए मेरी मेरी जोहरांजबी’ या धमाल गाण्यावर तिघे परफॉर्म करतायत. सुरुवातीला भरत जाधव एक स्टँड माईक घेऊन गाणं गायला सुरुवात करतात. इतक्यात निखिल चव्हाण आणि गौरव मोरे देखील माईक खेचून गाणं सुरु करतात. या तिघांची ही धमाल प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू देऊन गेली आहे. तर, या तिघांना पाहून प्रेक्षकांना ‘फिर हेराफेरी’मधील परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांची आठवण आली आहे. मराठीमध्ये ‘हेराफेरी’ तयार करा आणि त्यात याच तिघांना मुख्य भूमिकेत घ्या, अशी मागणी चाहत्यांनी केली आहे.

जालिंदर गंगाराम कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ (London Misal) या चित्रपटाची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आली होती. तेव्हापासूनच हा चित्रपट चर्चेत आला आहे. हटके नाव, विनोदी कलाकार आणि लंडनचं लोकेशन यामुळे हा चित्रपट नेमका कसा असेल, यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहीलेल्या एका नाटकावरून प्रेरित होऊन या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये सुरु असून वर्षअखेरीस ‘लंडन मिसळ’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा :

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात पडली वादाची ठिणगी; ‘ए किरण माने, तुला..’

Har Har Mahadev Trailer: ‘हर हर महादेव’चा ट्रेलर झाला रिलीज, बाजी प्रभूंच्या स्टाईलमध्ये शरद केळकरांची गर्जना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss