Manava Naik : “रुक तेरेको देखता हूँ…” त्याने मला धमकावलं…”, मनवा नाईकने शेअर केला उबरमधील धक्कादायक प्रसंग

Manava Naik : “रुक तेरेको देखता हूँ…” त्याने मला धमकावलं…”, मनवा नाईकने शेअर केला उबरमधील धक्कादायक प्रसंग

अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून मनवा नाईक मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रीय आहे. ‘ब्युटी विद बे्रन’ अशी ओळख असलेल्या याच मनवा नाईकसोबत अलीकडे एक धक्कादायक प्रसंग घडला. मनवाने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत, याबाबत खुलासा केला आहे. या पोस्टमध्ये तिने एका गाडीचा नंबर आणि त्या वाहन चालकाचा फोटो शेअर केला आहे.

T20 World Cup 2022 : T20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला दुसरा धोनी मिळाला, सुरेश रैनाने ‘या’ खेळाडूकडे बोट दाखवले

नेमकं काय घडलं ?

“माझ्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग तुमच्यासोबत शेअर करायलाच हवा. मी रात्री ८.१५ च्या आसपास एक उबर केली होती. वांद्रे-कुर्ला संकुलाच्या आसपास पोहोचल्यावर तो उबर चालक फोनवर बोलत होता. दरम्यान, मी त्याला फोनवर न बोलण्याचा सल्ला दिला. अशातच त्याने एक सिग्नलदेखील तोडला. मी वारंवार सांगून देखील तो त्याची मनमानी करत होता”.

पुढे गेल्यावर ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं. त्याचा फोटोदेखील क्लिक केला. त्यानंतर उबर चालकाने पोलिसांसोबत वाद घालायला सुरुवात केली. गाडीला फोटो काढला आहे तर आता आम्हाला जाऊ द्या असं मी पोलिसांना सांगितलं. त्यामुळे त्या चालकाला राग आला. तो मला म्हणाला,” तू ५०० रुपये भरणार आहेस का? त्याला मी म्हटलं,”फोनवर तू बोलत होतास”. त्यानंतर त्याने थांब तुला दाखवतो अशा शब्दांत धमकी द्यायला सुरुवात केली.

हेही वाचा : 

Raj Thackeray : ‘भाजपने निवडणूक लढवू नये’ अंधेरी पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र

उबर चालकाला मी गाडी पोलीस स्टेशनजवळ घ्यायला लावली. तर त्याने बीकेसीमधील जिओ गार्डन परिसरात गाडी थांबवली. दरम्यान मी त्याला पोलीस स्टेशनला चला सांगत होते. तर तो माझ्यासोबत वाद घालत होता. त्यानंतर मी उबर सेफ्टीला फोन केला. त्यादरम्यानदेखील तो वेगाने गाडी चालवत होता.

मी त्याला गाडी थांबव, असं सांगूनही त्याने माझं ऐकलं नाही. त्याने कोणाला तरी फोन केला. ते पाहून मी जोरजोरात ओरडू लागले. दोन दुचाकीस्वार आणि एका रिक्षाचालकाने मला त्या उबरमधून बाहेर काढण्यास मदत केली. त्यांनी त्या गाडीतून मला बाहेर काढलं. मी सध्या सुरक्षित आहे. पण नक्कीच या सर्व प्रसंगामुळे मी घाबरले आहे, असं मनवाने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. आतापर्यत त्या पोस्टवर शेकडो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत वाहनचालकाच्या उद्दामपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Shahaji Bapu Patil : ‘ह्या’ दोन राऊतांनी आमचं वाटोळं केलं, भर सभेत शहाजी पाटलांचा दावा

Exit mobile version