spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘जात बघुन मैत्री करणारा तू’….मेघा घाडगेनी केली पुष्कर जोगची कानउघजडणी

मराठी बिग बॉसमधून घराघरात पोहचलेला अभिनेता पुष्कर जोग हा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

मराठी बिग बॉसमधून घराघरात पोहचलेला अभिनेता पुष्कर जोग हा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या सर्वेसाठी आलेल्या बीएमसी कर्मचाऱ्याबद्दल केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे पुष्कर आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.’ कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या’, असे वक्तव्य त्याने या पोस्टमधून केले होते. कारण एवढेच होते की संबंधित कर्मचाऱ्याने त्याला जात सर्वेक्षण करण्यासाठी त्याची जात विचारली होती. संतापलेल्या पुष्करने पोस्ट करताच राजकीय मंडळी, बीएमसी कर्मचारी आणि मनोरंजन विश्वातील कलाकारांकडून पुष्करवर संताप्त व्यक्त करत आहेत.बीएमसी कर्मचारी संघटना असणाऱ्या द युनियन म्युनिसिपलने तर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित पुष्करवर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली होती. दरम्यान अभिनेत्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनच दिलगिरी व्यक्त केली असली तरीही, अद्यापही त्याच्या वक्तव्याचा निषेध केला जातो आहे.

मनोरंजन विश्वातीलच अनेक कलाकारांनी पुष्करविरोधात रोष व्यक्त केला आहे. किरण माने, अभिजीत केळकर, शरद पोंक्षे या कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे पुष्करच्या वक्तव्याचा निषेध केला आणि त्याला चांगलेच सुनावले आहे. आता अभिनेत्री मेघा घाडगेनेही त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘तुझ्या विचारांमध्येच घाण’ असल्याचं म्हणत तिने पुष्करला कणखर शब्दात सुनावले आहे.

मेघाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये असे लिहिले की, “#BMC #महिलासन्मान… जोग बोलणार आणि आम्ही गप्प बसणार? बाई माणुस नसत्या तर नक्कीच दोन लाथा मारल्या असत्या? तुला २ लाथा आणि कानाखाली मारावी अशी इच्छा झाली, पण तुझी भाषा आणि विचारसरणी पाहता वाईट वाटलं. कारण जात बघुन मैत्री करणारा तू. विचारांमध्येच घाण. काय करणार? अरे मित्रा त्यासाठी शासनाच्या सर्वेचा अभ्यास करावा. आजूबाजूला थोडी चौकशी करावी! माहितीचा फॉर्म हवा असल्यास माझ्याकडे आहे. तो मी नक्कीच तुला पाठवेन. तेही नको असेल तर तुझ्याच जातीचे काही माझे मित्रमैत्रिणी आहेत. जे तुझ्या विचारसरणीचे नाहीत, त्यांना तरी नक्की विचार. चित्रपटासाठीचा जर का हा केविलवाणा प्रयत्न असेल तर.. वा घाण …वा घाण … वा घाण..!”

दरम्यान पुष्करने या प्रकरणाबाबत दिलगिरीदेखील व्यक्त केली आहे. पुष्करने बीएमसी कर्मचाऱ्यांप्रति दिलगिरी व्यक्त करणारी पोस्ट शेअर करत असे म्हटले होते की, ‘मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की, मी केवळ माणूसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी…’दरम्यान आता पुष्करची ही पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

हे ही वाचा:

Union Budget 2024 : Economic Survey म्हणजे नेमकं काय? पहिल्यांदा कधी झाली होती सुरवात?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss