‘या’ मराठी अभिनेत्रीची बॉलीवूडमध्ये वर्णी

'अगडबम' (Agadbam) चित्रपटातील लोकप्रिय ठरलेली नाजुका अभिनेत्री तृप्ती भोईर (Trupti Bhoir) पुन्हा मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे.

‘या’ मराठी अभिनेत्रीची बॉलीवूडमध्ये वर्णी

‘अगडबम’ (Agadbam) चित्रपटातील लोकप्रिय ठरलेली नाजुका अभिनेत्री तृप्ती भोईर (Trupti Bhoir) पुन्हा मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. निर्माती आणि अभिनेत्री म्हणून ठसा उमटवलेल्या तृप्ती भोईर आता नव्या विषयासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी ‘पारो द अनटोल्ड स्टोरी ऑफ स्लॅव्हरी’ (Paro the Untold Story of Slavery) या चित्रपटाच्या माध्यमातून तृप्ती भोईर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक गजेंद्र अहिरे (Gajendra Ahire) करणार आहेत. गजेंद्र अहिरे हे देखील या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच कालावधीनंतर हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

तृप्ती भोईरने आजवर सिनेसृष्टीमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. यात तृप्तीने साकारलेली ‘अगडबम’ मधील ‘नाजूका’ आणि ‘टुरिंग टॉकीज’ मधील ‘चांदी’ ही तिची व्यक्तिरेखा चांगलीच गाजली. आता तृप्ती आपल्या नव्या भूमिकेसह आणि वेगळ्या विषयासह बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘पारो द अनटोल्ड स्टोरी ऑफ स्लॅव्हरी’ या हिंदी चित्रपटात तृप्ती भोईर ही मुख्य भूमिकेत असून तिच्या सोबत शाह बादुशाह (Shah Badushah) झळकणार आहे. तसेच गोविंद नामदेव (Govind Namdev) आणि इतर कलाकार दिसणार आहेत.

‘पारो द अनटोल्ड स्टोरी ऑफ स्लॅव्हरी’ या चित्रपटाची कथा तृप्ती भोईर यांची असून पटकथा आणि गीत गजेंद्र अहिरे यांनी दिले आहेत. तसेच चित्रपटाला सतीश चक्रवर्ती (Satish Chakravarthy) हे संगीतबद्ध करणार आहेत. चित्रपटाचे संकलन हे दिग्गज संकलक बल्लू सलूजा (Ballu Saluja) करणार आहेत. प्रेक्षकांना या आगामी चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या चित्रपटाच्या केंद्रस्थानी महिलांचे प्रश्न असणार आहेत. गजेंद्र अहिरे आणि तृप्ती भोईर यांचा ‘टुरिंग टॉकीज’ हा सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष रूपाने गाजला होता. तर त्यांचा आगामी हिंदी चित्रपट आपले उच्च स्थान गाठेल की नाही हे महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : घाटकोपर होल्डिंग दुर्घटनेवर आमदार सत्यजित तांबे यांनी उठवला आवाज

Zika Virus चा पुण्यात शिरकाव, काय आहेत लक्षणे?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version