Sajid Khan चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने त्याने बोलावलं आणि…., मराठी अभिनेत्रीनं साजिद खान बाबत केला खुलासा

Sajid Khan चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने त्याने बोलावलं आणि…., मराठी अभिनेत्रीनं साजिद खान बाबत केला खुलासा

बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक (Famous producer and director of Bollywood Sajid Khan) म्हणून ओळखला जाणारा साजिद खानची सध्या हिंदी बिग बॉसच्या घरात आहे. बिग बॉसमध्ये त्याला घेण्यासाठी सलमानची लॉबिंग कारणीभूत ठरल्याचा आरोप अनेक प्रेक्षकांनी केला होता. महिला आयोगानं देखील बिग बॉसच्या निर्मात्यांना साजिदला बिग बॉसमधून बाहेर काढण्यासाठी नोटीस देखील दिली होती. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. दरम्यान मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेत्रींनी साजिदनं आपल्याला कसा त्रास दिला याविषयी सांगितलं आहे.

हेही वाचा : 

आदित्यनंतर उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ, दिशा सालियन प्रकरणात गुप्तचर विभागाकडून होणार चौकशी

अशातच मराठी अभिनेत्री जयश्री गायकवाड (Marathi actress Jayshree Gaikwad) ने साजिद खानवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. जयश्रीने एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये ती म्हणते की, ‘आठ वर्षांपूर्वी एका कास्टिंग डायरेक्टरने मला एका पार्टीला नेले होते. तिथे माझी साजिद खानशी ओळख झाली. साजिदला भेटून मला खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी साजिदने मला त्याच्या कार्यालयात बोलावलं. तो म्हणाला की तो एक चित्रपट बनवत आहे आणि कदाचित त्यात माझ्यासाठी एखादी भूमिका असेल. मी त्याच्या कार्यालयात जाताच त्याने मला स्पर्श करत अश्लील कमेंट करण्यास सुरुवात केली. साजिद खान मला म्हणाला की तू खूप सुंदर आहेस पण मी तुला का काम देऊ? मग मी त्याला म्हणाले की सर तुम्हाला काय हवे आहे. मी चांगला अभिनय करू शकतो. मग तो म्हणाला की अभिनय चालत नाही. मी जे सांगतो, ते तुला करावं लागेल. त्याक्षणी मला खूप राग आला होती. त्याला मारावसंही वाटत होतं. मी रागातच तिथून निघून गेले.’

2023 IPL Auction आयपीएलच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! २०२३ आयपीएल लिलावाला आज होणार सुरुवात

साजिद खानवर त्याची एक्स असिस्टंट सलोनी (MeToo) चोप्राने आरोप केले होते. याशिवाय पत्रकार करिश्मा उपाध्याय यांनीही त्यांच्यावर अश्लील आणि असभ्य बोलण्याचा आरोप केला होता. डिंपल पॉल, अभिनेत्री आहाना कुमरा, अभिनेत्री मंदाना करीमी, अभिनेत्री-मॉडेल शर्लिन चोप्रा, दिवंगत अभिनेत्री जिया खान आणि अभिनेत्री सिमरन सुरी यांचाही पीडितांच्या यादीत समावेश आहे. सर्वांनी त्यांच्या वतीने चित्रपट निर्मात्याच्या विरोधात पुरावेही सादर केले होते, त्यानंतर त्याच्यावर काही काळासाठी बंदी घालण्यात आली होती.

Bhay Shortfilm नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तिचे आयुष्य अखेर कोणत्या वळणावर जाते? उत्तर दडलंय ‘या’ लघुपटात

Exit mobile version