सुप्रिया पठारेंचा मुलगा करतो ‘हा’ व्यवसाय

संजीव कपूर यांच्या खाना खजाना या शोमध्ये त्यांनी सहभाग देखील घेतला होता. मिहीर अमेरिकेत देखील काही काळ होता नंतर त्याने मायदेशी परतून स्वतःचा व्यवसाय सुरु केला.

सुप्रिया पठारेंचा मुलगा करतो ‘हा’ व्यवसाय

सुप्रिया पठारेंचा मुलगा करतो 'हा' व्यवसाय

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीत एकाच कुटुंबातील अनेक पिढ्या काम करताना दिसून येतात. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अभिनयाचा वारसा चालत आलेला आपण बघत आलो आहोत. पण मराठी सिनेसृष्टी मात्र याला काही प्रमाणात अपवाद ठरली आहे. मराठीमध्ये असे कलाकार आहेत ज्यांची मूलं, मुली इतर क्षेत्रात क्षेत्रात कार्यरत आहेत. आणि असे कलाकार देखील आहेत, ज्यांना आपलं व्यक्तिगत आयुष्य जगासमोर आण्याला फारस आवडत नाही. मराठीतील अशीच एक अभिनयात निपुण असणारी आपल्या साऱ्यांची आवडती अभिनेत्री जिने तिच्या केवळ अभिनयाने नव्हे तर विनोद बुद्धीने साऱ्यांना हसायला भाग पाडलं अशी अभिनेत्री म्हणजे ‘सुप्रिया पाठारे’

हेही वाचा :

कंबर मटकवत माकडांनी केला हूला हूप डान्स

सुप्रिया यांनी मराठी सृष्टीत आजवर अनेक प्रकारच्या भूमिका केल्या. ‘फु बाई फु’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘मोलकरीणबाई’, ‘श्रीमंताघरची सून’, ‘चि. व चि. सौ कां’, ‘बाळकडू’ अशा चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून त्यांच्या अभिनयातून त्या घराघरात पोहचल्या. गेल्या अनेक वर्षांपासून सुप्रिया पाठारे यांनी मराठी सृष्टीला एक भरीव योगदान दिले आहे. सध्या सुप्रिया “ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत माधवी कानिटकर हे पात्र साकारत आहेत. सुप्रिया या सामान्य कुटुंबातून आलेल्या आहेत. प्रसंगी त्यांनी भांडी देखील घासली आहेत. परंतु आता या गोष्टीला खूप काळ लोटला आहे. सध्या त्यांची बहीण ‘अर्चना नेवरेकर’ यांनी देखील सिनेसृष्टीत आपलं चांगलं नाव कमावलं आहे. दोघीही बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.

सुप्रिया पाठारे यांच्या मुलाने अभिनयाकडे न वळता आपली स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा मुलगा मिहीर पाठारे हा शेफ आहे. संजीव कपूर यांच्या खाना खजाना या शोमध्ये त्यांनी सहभाग देखील घेतला होता. मिहीर अमेरिकेत देखील काही काळ होता नंतर त्याने मायदेशी परतून स्वतःचा व्यवसाय सुरु केला.मिहीरने महाराजा नावाचे स्वतःचे हॉटेल सुरु केले आहे. खवय्यांसाठी हि आनंदाची बातमी आहे. 14 जुलैपासून त्याचे हे हॉटेल सुरु झाले असून त्याच्या हातची पावभाजी सगळ्या खवय्यांसाठी मेजवानी ठरणार आहे. मिहीर आणि त्याच्या मित्राने हा व्यवसाय सुरु केला असून. त्या दोघांच्या हातचे वेगवगळे पदार्थ इथे चाखायला मिळतील. मिहीरला त्याच्या या नव्या व्यवसायासाठी अनेक मराठी कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version