spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘मराठा लढतो तेव्हा इतिहास घडतोच’…आरक्षण मिळाल्यानंतर प्राजक्ता गायकवाडची खास पोस्ट

मराठा आरक्षणाचा आज ऐतिहासिक विजय झाला आहे,कित्येक महिन्यांपासून सुरु असलेला लढा अखेर संपला आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्याबाबतचा अध्यादेशही काढण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाज सध्या आनंद व्यक्त करत असून ठिकठिकाणी पेढे वाटपाचा कार्यक्रम सुरू आहेत. या मराठा आनंदोलनात अनेक मराठी कलाकारांनी देखील आपला पाठिंबा दिला होता. आतामागण्या मान्य झाल्यावर कलाकारांनीही आनंदाची पोस्ट शेअर करायला सुरुवात केली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने एक व्हिडिओ शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे.

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ता गायकवाडवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. तिची येसूबाईंची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती.. या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. प्राजक्ताने जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती. आता जेव्हा आरक्षण मान्य झालं आहे तेव्हा प्राजक्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक तेव्हाचा व्हिडिओ शेअर केला आहे जेव्हा ती मराठा क्रांती मोर्चाच्या समर्थनासाठी मंचावर भाषण देत होती. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिलं, ‘जेव्हा मराठा लढतो तेव्हा इतिहास घडतोच.’ यासोबतच #मराठा #९६कुळी_मराठा #एक_मराठा_लाख_मराठा #जरांगे_पाटील #मराठाआरक्षण #मराठा_साम्राज्य #अभिमान #नाद #स्वराज्य असे अनेक हॅशटॅग देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. चाहत्यांनीही तिच्या पोस्टवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.दरम्यान प्राजक्ता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते ता तिचे फोट आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते,तसचं सोशल मीडियावर ती सामाजिक संदेश देत भाष्य देखील करत असते.

लढलो आणि जिंकलो’, ‘मराठा खड़ा तो सरकार से बड़ा’, ‘हा इतिहास सांगतो..’ अशा अनेक प्रतिक्रिया देत चाहत्यांनी प्राजक्ताच्या पोस्टला पाठिंबा दिला आहे.अखेर आज मिळालेल्या या आरक्षणामुळे सर्व मराठा समाज हा आनंद साजरा करत आहे.

हे ही वाचा:

मराठा जनेतेने कायद्याचे वाचन करावे, हे आरक्षण टिकणारं नाही – गुणरत्न सदावर्ते

१६ फेब्रुवारीपर्यंत मराठा आरक्षणावर हरकत घेण्याची मुदत, छगन भुजबळांची विनंती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss