spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

प्राजक्ता माळी झळकणार ‘भिशी मित्र मंडळ’ या आगामी चित्रपटात

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच कोणत्यान कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असते,तिचे वैयक्तिक विषय असो किंवा रोखठोक बोलणं ती नेहमीच चर्चेचा विषय बनते.

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच कोणत्यान कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असते,तिचे वैयक्तिक विषय असो किंवा रोखठोक बोलणं ती नेहमीच चर्चेचा विषय बनते.प्राजक्ता महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात सुत्रसंचलानाची धुरा सांभाळते.प्राजक्ताने स्वत:चे प्राजक्तराज हे दागिन्यांचे शॉप देखील उभं केलं आहे.

आता प्राजक्ता निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यातच आता मोठ्या काळानंतर प्राजक्ता माळी पुन्हा एकद्या मोठ्या पडद्यावर झळकरणार आहे. या चित्रपटात प्राजक्ता मुख्य भूमिकेत दिसरणार आहे.’भिशी मित्र मंडळ’ असं तिच्या आगाम चित्रपटाचं नावं आहे.   मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणुन प्राजक्ता माळीला ओळखलं जातं. आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाचे पैलू दाखवले आहेत.आता प्राजक्ता एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांना भेटण्यास सज्ज झालीये. नुकतच या चित्रपटाचा मुहूर्त पुण्यात पार पडला. यावेळी  चित्रपटाचे निर्माते, प्रस्तुतकर्ते, लेखक, दिग्दर्शक आणि तांत्रिक टीम उपस्थित होती. अमोल कागणे आणि शरद पाटील हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. किरण कुमावत, लक्ष्मण कागणे, विनया मोरे, अजिंक्य जाधव, अक्षय बोडके आणि गौरी पाठक यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संभाळली आहे.

सागर पाठक यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे तसेच सुमित संघमित्र हे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाच्या शुटींगला लवकरच पुण्यात सुरु होणार आहेत. भिशी मित्र मंडळ या चित्रपटामध्ये प्राजक्तासोबत कोणते कलाकार दिसणार याची नावं अजुन समोर आलेली नाहीत.

भिशी म्हणजे,  ग्रुपमधील सदस्य प्रत्येक महिन्याला ठराविक पैसे एकत्र करून ते टप्प्याटप्प्याने सर्वांना वापरण्यासाठी दिले जातात. साधारणत: प्रत्येक महिन्याला ग्रुपमधील एका सदस्याच्या घरी किंवा त्यांनी ठरवलेल्या एका ठिकाणी जमून, पैसे गोळा करून ते एक सदस्याला दिले जातात. भिशी हा प्रकार विशेषत: महिला, कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये अधिक प्रचलित आहे. याच भिशीवर आधारित ही गोष्ट आहे. त्यामुळे धमाल, कॉमेडी  आणि निखळ मनोरंजक कथानक असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरेल. दरम्यान आता प्राजक्ताचा हा कमबॅक प्रेक्षकांना किती भावणार हे पाहणं महत्तवाचं ठरणारं आहे.

हे ही वाचा: 

Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत Ashok Chavan यांचा भाजपमध्ये प्रवेश

लोकसभेसाठी सर्वांचा वापर करतील आणि नंतर घरी पाठवतील- Ambadas Danve

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss