spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘तुमची मुलगी या जागी असती’…चाहत्यांवर भडकली रिंकू,नेमकं घडलं काय?

जळगावांत शासनाकडून महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

जळगावांत शासनाकडून महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला विशेष पाहुणी म्हणुन सैराट फेम रिंकू राजगुरु हीने हजेरी लावली.तिला पाहण्यासाठी जळगावात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात चाहत्यांची बरीच गर्दी पाहायला मिळाली. पण या गर्दीतून बाहेर जाताना मात्र आर्ची चिडल्यांच पाहायला मिळालं. गर्दीतून बाहेर पडताना एका चाहत्याचा धक्का रिंकुला लागला. त्यामुळे रिंकु चिडल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं.तुमची मुलगी या जागी असती तर तुम्हाला चाललं असतं का? असा सवाल रिंकुने चाहत्यांना केला. रिंकूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

जळगावमध्ये या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन शासनाकडून करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रिंकुने हजेरी लावली. सैराट या चित्रपटातून आर्ची म्हणून रिंकु चाहत्यांच्या पसंतीस उतरली.या कार्यक्रमावेळीही रिंकुने सैराटमधील तिचे फेमस डायलॉग म्हटले. विशेष म्हणजे हा डायलॉग तिने खान्देशी भाषेत म्हणून दाखवला. त्यावेळी चाहत्यांनी तिला दाद दिली. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर तिथून बाहेर पडताना काही चाहत्यांनी गर्दीत धक्काबुक्की केली. त्यामुळे रिंकूचा राग अनावर झाला. या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन शासनाकडून करण्यात आलं होतं. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यास आयोजकांना काही प्रमाणात अपयश आल्याचं पहायला मिळालं. 

सैराट या चित्रपटातून आर्ची आणि परश्याची जोडी महाराष्ट्राच्या भेटीला आली. या चित्रपटातील आकाशची सहअभिनेत्री रिंकु राजगुरुची आजही तितकीच चांगली मैत्री आहे. पण मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे लाडके आर्ची आणि परश्या हे फार चर्चेत आले होते. ‘सैराट’नंतर रिंकूने इतरही काही चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली..काहीमहिन्यांपुर्वी रिंकूचा झिम्मा-2 हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 

हे ही वाचा:

मर्यादा संपल्यानंतर मराठा परफेक्ट कार्यक्रम करतात; मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

आलो तर तुझा,गेलो तर समाजाचा,मनोज जरांगे यांच्या संघर्षयोध्दा चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

 

Latest Posts

Don't Miss