spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दगडी चाळ 2 – पुन्हा अनुभवायाला मिळणार डॅडींचा दरारा

डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाला पुन्हा हाच दरारा प्रेक्षकांना रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

२०१५ साली आलेल्या ‘दगडी चाळ’ या अरुण गवळी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा ”दगडी चाळ २’ (Dagadi Chawl) हा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘चुकीला माफी नाही’ हा मकरंद देशपांडेचा डायलॉग विशेष गाजला होता. त्यामुळे पुन्हा हाच दरारा प्रेक्षकांना रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाला या शहराच्या इतिहासातील किंबहुना गँगवॉरच्या इतिहासातील एक महत्वाचे नाव म्हणजे अरुण गुलाब गवळी.
मुंबईत राहून आपल्या मराठी लोकांच्या पाठीशी उभा राहिलेला, चाळीच्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाला पोलिसांच्या आधी न्याय देणारा दगडी चाळीचा रॉबिन हूड, म्हणजेच अरुण गुलाब गवळी उर्फ ‘डॅडी’. ‘दगडी चाळ’ मध्ये डॅडी हे वास्तविक पात्र असलं तरी कथा काल्पनिक होती. दुसऱ्या भागाची कथादेखील डॅडीभोवती फिरणार असून कथा काल्पनिक असणार आहे. नुकतीच सोशल मीडियाद्वारे या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली  आहे.
मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ हा चित्रपट येत्या १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेता अंकुश चौधरी हे देखील या चित्रपटात दिसून येणार आहेत.  तुफान कोसळणारा पाऊस आणि अनेक लोकांच्या घोळक्यातून समोर येणारे अरुण गुलाब गवळी म्हणजेच मकरंद देशपांडे यांची दमदार एन्ट्री पाहून पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. या चित्रपटात काय नवीन पाहायला मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Latest Posts

Don't Miss