spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मराठा योद्धांच्या उदयाची गाथा सांगणार ‘रणधुरंधर’

सध्या मराठी सिनेसृष्टीत वेगवेगळ्या धाटणीचे मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.

सध्या मराठी सिनेसृष्टीत वेगवेगळ्या धाटणीचे मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.अशातच आता ‘रणधुरंधर हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.अनेक ऐतिहासिक चित्रपटांची पर्वणी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.प्रेक्षकांमध्ये देखील या चित्रपटांमधील वाढता कल दिसून येत आहे.

दरम्यान गणराज स्टुडिओ प्रस्तुत, श्रेयश जाधव दिग्दर्शित ‘रणधुरंधर..’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. मराठा योद्धांच्या उदयाची गाथा सांगणारा हा चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटाची वैशिष्टता म्हणजे हा चित्रपट फक्त मराठीतच नव्हे तर इंग्रजी, हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड, गुजराथी आणि पंजाबी भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे. भाग्यश्री जाधव, अमित भानुशाली, अनुप अशोक देशपांडे या चित्रपटाचे निर्माता आहेत. यापूर्वीही गणराज स्टुडिओ आणि अमित भानुशाली यांनी एकत्र काम केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते या चित्रपटाच्या माध्यमातून अशीच एक दर्जेदार कलाकृती घेऊन येत आहेत. या चित्रपटात कलाकार कोण असणार, याबाबत सध्या तरी गोपनीयता आहे. पॅन इंडिया असलेला हा चित्रपट भव्यदिव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, ” ही कहाणी वीर योद्धांची आहे, लढाईत शत्रूला भयभीत करून सोडणाऱ्या रणधुरंधराची गाथा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आम्ही या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा एक बिग बजेट चित्रपट असून याची भव्यता तुम्हाला चित्रपट पाहूनच जाणवेल.”श्रेयश जाधव यांनी यापूर्वी ‘मी पण सचिन’, ‘फकाट’ असे जबरदस्त चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत. लवकरच त्यांचे ‘डंका हरिनामाचा’, ‘जंतर मंतर छू मंतर’ हे चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.दरम्यान या चित्रपटाला प्रदर्शित होण्यासाठी जरी बराच वेळ असला तरी या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाबाबतची उस्तुक्ता प्रेक्षकांमध्ये आहे.

हे ही वाचा:

पेरूच्या पानांमध्ये ‘हे’ पदार्थ मिक्स करून खाल्ल्याने शरीराला होतो फायदा, जाणून घ्या फायदे

महिला दिनानिमित्त आपल्या आवडत्या व्यक्तीला द्या ‘या’ खास भेटवस्तू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss