Marathi Rangbhumi Din 2022 : मराठी रंगभूमी दिनी नाट्यरसिकांना मनोरंजनाची मेजवानी; जाणून घ्या कोणत्या नाट्यगृहात कोणते नाटक…

'मराठी रंगभूमी दिन' (Marathi Rangbhumi Din) नाट्यवर्तुळात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ५ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी 'मराठी रंगभूमी दिन' म्हणून साजरा केला जातो.

Marathi Rangbhumi Din 2022 : मराठी रंगभूमी दिनी नाट्यरसिकांना मनोरंजनाची मेजवानी; जाणून घ्या कोणत्या नाट्यगृहात कोणते नाटक…

‘मराठी रंगभूमी दिन’ (Marathi Rangbhumi Din) नाट्यवर्तुळात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ५ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी ‘मराठी रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. विष्णूदास भावे यांनी १८४३ साली ‘सीता स्वयंवर’ हे पहिले नाटक सांगली येथे रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला. या घटनेचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.

गेल्यावर्षी हा दिवस कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तिसऱ्या घंटेविनाच साजरा झाला. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रंगकर्मींनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. मराठी रंगभूमी दिनानिमित्त ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ (eka lagnachi pudhchi goshta) ते ‘चारचौघी’ (Chaarchoughi) अशा अनेक दर्जेदार नाटकांचे प्रयोग रंगणार आहेत.

वेगवेगळ्या धाटणीची नव-नवीन नाटकं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात विजय केंकरेंच्या ‘यू मस्ट डाय,’ ‘काळी राणी’ व ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या तीन रहस्यप्रधान नाटकांचा समावेश आहे. ‘जाऊ बाई जोरात’च्या दुसऱ्या भागाची तयारी सुरू आहे. ‘संगीत अवघा रंग एक झाला’ हे जुने नाटकही नव्या संचात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठी रंगभूमी दिनानिमित्त जाणून घ्या कोणत्या नाट्यगृहात कोणत्या नाटकाचा प्रयोग रंगेल…

चारचौघी (रौप्यमहोत्सवी प्रयोग) – प्रबोधनकार ठाकरे (बोरिवली) – रात्री ८.३० वा.
एका लग्नाची पुढची गोष्ट – शिवाजी मंदिर (दादर) – दुपारी ३.३० वा.
३८ कृष्ण व्हिला – दीनानाथ नाट्यगृह (पार्ले) – दुपारी ४.१५ वा.
आवर्त – प्रबोधनकार ठाकरे (बोरिवली) – दुपारी ४.३० वा.
दादा एक गुड न्यूज आहे – गडकरी रंगायतन (ठाणे) – दुपारी ४.३० वा.
खरं खरं सांग – विष्णुदास भावे (वाशी) – दुपारी ४ वा.
मौनराग (शतक महोत्सवी प्रयोग) – शिवाजी मंदिर (दादर) – रात्री ४.३० वा.
संज्या छाया – मराठी रंगभूमीदिनी ‘संज्या छाया’ कोल्हापूरात!

हे ही वाचा :

Gujarat Elections 2022 : गुजरात विधानसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

CM Eknath shinde : शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

IPL 2023 : २०२३च्या आयपीएल मध्ये रवींद्र जडेजाच्या संघ बदलण्याच्या निर्णयावरून एमएस धोनी म्हणाला…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version