‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपी यादीत पहिल्या क्रमांकावर

छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन करत असते.विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रेक्षकांना नेहमीच भावतात.

‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपी यादीत पहिल्या क्रमांकावर

छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन करत असते.विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रेक्षकांना नेहमीच भावतात.नेहमीच्या या मालिका प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय होऊन जातो.मालिकेत घडणारे नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना मालिका पाहण्यासाठी खिळवुन ठेवत असतात.तर अशातच दर आठवड्याला मालिकेचा टीआरपी लिस्ट येते.त्यात मालिकेत येणारे चढ-उतार पाहायला मिळतात.तर नुकतच या आठवड्यातील टीआरपी लिस्ट पुढे आली आहे.यात पहिल्या क्रमांकावर पुन्हा एकदा ठरलं तर मग या मालिकेने बाजी मारली आहे.गेले कित्येक आठवडे या मालिकेने आपला हा पहिला क्रमांक रोखुन धरला आहे.प्रेक्षकांनी ठरलं तर मग या मालिकेला चांगला प्रतिसाद दिला आहे.सायली – अर्जुनची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.सध्या मालिकेत सायली-अर्जुनची माथेरन ट्रीप दाखवत आहेत.त्या ट्रीप मध्ये अर्जुन सायलीच्या प्रेमात पडतो.मात्र आता तो आपल्या प्रेमाची कबुली सायलीला कधी आणि कशी देणार हे पाहणं आता औस्तुक्तेचं ठरणार आहे.दरम्यान अभिनेत्री जुई गडकरीच्या  ‘ठरलं तर मग’ या मालिकेने नेहमीप्रमाणे या आठवड्यातही टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे. तर  टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या…

1.’ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे.

  1. तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.7 रेटिंग मिळाले आहे.
  2. ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.7 रेटिंग मिळाले आहे.
  3. ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ ही मालिका चौथ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.4 रेटिंग मिळाले आहे.
  4. टीआरपी लिस्टमध्ये ‘आई कुठे काय करते’ ही मालिका पाचव्या स्थानावर आहे. या मालिकेला 5.6 रेटिंग मिळाले आहे.
  5. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सहाव्या क्रमांकावर असून या मालिकेला 5.5 रेटिंग मिळाले आहे.
  6. ‘कुन्या राजाची गं तू रानी’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सातव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 5.4 रेटिंग मिळाले आहे.
  7. ‘मन धागा जोडते नवा’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.7 रेटिंग मिळाले आहे.
  8. ‘शुभविवाह’ ही मालिका नवव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 3.5 रेटिंग मिळाले आहे.
  9. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 3.3 रेटिंग मिळाले आहे.

हे ही वाचा:

रोहित पवारांच्या अंगात रक्त वाहत नाही जातीयवाद वाहतोय, गोपीचंद पडळकरांची पवारांवर टीका

सरकारने नियम डावलून केलेल्या नियुक्त्या रद्द कराव्यात, वडेट्टीवार यांची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version