‘हर हर महादेव’मध्ये स्त्रियांचा बाजार, संभाजीराजेंचा चित्रपटाला विरोध

‘हर हर महादेव’मध्ये स्त्रियांचा बाजार, संभाजीराजेंचा चित्रपटाला विरोध

Sambhajiraje Chatrapati on har har mahadev : हर हर महादेव या चित्रपटाचा संभाजीराजे छत्रपती यांनी सुरुवातीपासूनच कडाडून विरोध केला होता. या चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याचे संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून सांगण्यात आले होते. तेवढेच नाही तर या चित्रपटात इतिहासच चुकीचा दाखवला आहे असे संभाजीराजे छत्रपती यांनी संगितले होते.आता हर हर महादेव हा चित्रपताची पहिली स्क्रीनिंग ही महाराष्ट्रातच व्हायला हवी आणि या संदर्भात संभाजीराजे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार आहेत. तसेच ‘चुकीचा इतिहास दाखवण्यापेक्षा चित्रपट काढू नका.’ असे संभाजीराजे यांनी सांगितले आहे. संभाजीराजे (Sambhajiraje Chatrapati on har har mahadev) आज बेळगाव दौऱ्यावर जाणार आहेत. दौऱ्यापूर्वी त्यांनी हर हर महादेव चित्रपट झी मराठीवर दाखवला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट केली.

शरद केळकर आणि सुबोध भावे अभिनित हर हर महादेव चित्रपटाला छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यापासूनच चित्रपटाचा विरोध केला होता. कारण या अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. तर आता या संदर्भात संभाजीराजे थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी संगितलं की हर हर महादेव या चित्रपटाचे पहिले प्रदर्शन महाराष्ट्रातच व्हावे . संभाजीच्या भूमिकेबद्दल इतिहास संशोधकांनी त्यांचे मत मांडावे. जर माझी भूमिका चुकीची असेल, तुम्ही सांगावे, मी पुन्हा कधीही अशा चित्रपटांवर पत्रकार परिषद कधीही घेणार नाही. चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवण्यात आला आहे. बाजीप्रभू आणि शिवाजी महाराज यांच्यात लढाई होणे हे तुम्हाला मान्य आहे का? असा सवालही संभाजीराजे यांनी विचारला आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी पुढे संगितलं की, हर हर महादेव चित्रपटामध्ये स्त्रियांचा बाजार मांडल्याचे दाखवण्यात आले आहे. शिवरायांचा काळात स्त्रियांचा बाजार भरला होता का? तर हा चित्रपट इतिहासकारांनी आणि मुलांनी पाहू नये. सध्याच्या काळात मुलांचे इतिहासाच्या बाबतीत वाचन आणि अभ्यास कमी आहे. त्यामुळे त्यांनी हा चित्रपट बघू नये. ऐतिहासिक चित्रपटासाठी इतिहासकारांची नेमणूक आवश्यक आहे. चित्रपटात पाटील हा बलात्कारी दाखवला हे कुठं लिहिलं आहे? त्यामुळे हा चित्रपट इतिहासकार आणि मुलांनी पाहूच नये असे संभाजीराजे यांनी सांगितले आहे.

 

New Year 2023 : नवीन वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांची मेजवानी तुम्हाला माहित आहे का ?

Exit mobile version