spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत  नवा ट्विस्ट,नयना-अद्वैतच्या लग्नात नवरीच्या वेशात दिसतेय कला

छोट्या पडद्यावरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका अल्पवधीतच लोकप्रिय ठरली आहे.ही मालिका आणि मालिकेतील कलाकारांवर प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत.

छोट्या पडद्यावरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका अल्पवधीतच लोकप्रिय ठरली आहे.ही मालिका आणि मालिकेतील कलाकारांवर प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत.सध्या या मालिकेत लग्नाची धामधुम सुरु आहे.मालिकेत अद्वैत आणि नयनाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे.लग्न जरी नयना आणि अद्वैतचं होणार असलं तरी योगायोगाने कला आणि अद्वैतला आयुष्यभरासाठी एकत्र आणणाऱ्या घटना घडताना दिसत आहेत. साखरपुड्याची अंगठी अद्वैतकडून नयनाऐवजी कलाच्या बोटात घातली गेली. लग्नाची उष्टी हळदही नयनाऐवजी कलाला लागली. आता नयना आणि अद्वैत यांच्या लग्नात मोठा ट्विस्ट येणार आहे. आणि मालिका म्हंटलं तर हे असे नवनवीन ट्विस्ट तर आपल्याला पाहयला मिळणार हे नक्की.दरम्यान ट्विस्ट आणि मालिका हे समीकरण तसंही जुनचं आहे.

दरम्यान या मालिकेत असं दिसतय की नयनाला देखील अद्वैतशी लग्न करायचं नसतं,नयनाचंही अद्वैतच्या भावावर म्हणजे राहुलवर प्रेम असतं,तरीही देखील आतापर्यंत ती लग्नाच्या विधी करताना दिसून येतं आहे.आणि लग्नाच्या बाबतीत म्हणायचं गेलं तर कलाचं अद्वैत सोबत लग्न होणार का ? कारण सध्या सोशल मीडियावर कलाचं नवरीच्या वेशातला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.त्यामुळे अद्वैत नक्की कोणाशी लग्न करणार ? आणि यादरम्यान नयना पुढे काय करणार? असे उत्कंठावर्धक पेच या मालिकेत आपल्याला येत्या भागात पाहयला मिळणार आहे.

नियतीच्या मनातही अद्वैत आणि कलाने एकत्र यावं ही एकच इच्छा आहे. साखरपुडा, हळद आणि संगीत तर पार पडलंय. त्यामुळे आता उत्सुकता आहे ती लग्नाची. अक्षर कोठारी ईशा केसकर दिपाली पानसरे आणि किशोरी आंबिये हे कलाकार लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

ठरलं तर मग मालिकेतील सायली आणि अर्जुन अद्वैतच्या लग्नात पाहुणे म्हणुन येणारं आहेत.आणि याचदरम्यान मालिकेत मोठा ट्विस्ट घडणार आहे.दरम्यान आता त्यामुळे अद्वैतच्या घरात लक्ष्मीच्या पाऊलांनी नयना येणार की कला?  हे लवकरच स्पष्ट होईल.हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उस्तुक आहेत.

हे ही वाचा:

त्वचेची काळजी घेण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

आमदार अनिल बाबर यांचा ‘सरपंच ते आमदार’ की मिळवण्यापर्यंतचा प्रवास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss