मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री मेघा धाडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री मेघा धाडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री मेघा धाडे हिने बिग बॉस मराठी सिझन १ गाजवणारी आणि बिग बॉस मराठी सिझन १ चे विजेते पदही पटकावले. मेघा घाडगे ही मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे. मेघा सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते. अनेकदा ती विविध गोष्टींवर प्रतिक्रिया देत असते आणि तिची मते मांडत असते. ‘बिग बॉस मराठी’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून त्या शोच्या पहिल्या दिवसापासून मेघा चर्चेत होती. विशेष म्हणजे आजही तिची चर्चा चाहत्यांमध्ये रंगते.

मेघा धाडे हिने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये मेघा धाडे हिने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षा अभिनेत्री प्रिया बेर्डेही उपस्थित होत्या. इस्ट मज्जा नावाच्या इन्साग्राम पेजने मेघाचा भाजपात प्रवेश करतानाचा व्हिडीओ शेअऱ केला आहे.

मागील वर्षी फ्रेबुवारीमध्ये अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनीही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. प्रिया बेर्डे यांनी २०२० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी प्रिया बेर्डे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हातावर घड्याळ बांधले होते. परंतु दोन वर्षातच त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. आता त्या भाजपच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत.

हे ही वाचा:

NEET UG Result 2023: नीट परीक्षेत मुंबईच्या विद्यार्थ्याने मारली बाजी; राज्यातून पहिला

Sushant Singh Rajput ला जाऊन आज तीन वर्ष पूर्ण, कुटुंबीय आज ही शोकात…

आषाढीसाठी विठुरायाच्या दगडी मुर्त्या बाजारात सज्ज; लाखो रुपयांची उलाढाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version