spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मायकल जॅक्सनने मागे सोडली इतकी संपत्ती, मृत्यूनंतरही कमावले करोडो

संगीत आणि नृत्य जगतातील प्रसिद्ध आणि दिग्गज कलाकार, आजच्या दिवशी म्हणजे २९ ऑगस्ट १९५८ रोजी जन्म झाला. अमेरिकेतील इंडियाना प्रांतात जन्मलेले मायकल जॅक्सन हे नंतर किंग ऑफ पॉप म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. पॉप ग्रुपमधून कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर, जगाचा निरोप घेऊनही आपले नाव आणि ओळख पुसून टाकू शकणार नाही अशी यशाची पातळी त्यांनी गाठली. मायकल जॅक्सन आता या जगात नाहीत. मायकल जॅक्सन यांचे २००९ साली निधन झाले, पण जग सोडून इतक्या वर्षानंतरही मायकल जॅक्सनच्या फॅन फॉलोइंगमध्ये कोणतीही घट झालेली नाही. जगातील सर्वात मोठा पॉप स्टार बनलेल्या मायकेल जॅक्सनला जगभरातील चाहत्यांचे केवळ प्रसिद्धी आणि प्रेमच मिळाले नाही तर तो अगणित संपत्तीचा मालकही बनला.

आज कोल्हापुरात ‘गोकुळ’ची सभा गाजणार; विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने

मायकल जॅक्सनने आपल्या मागे मोठी संपत्ती सोडली आहे. त्यांनी नेव्हरलँड रांच ही मालमत्ता सुमारे $20 दशलक्ष किंवा 160 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीत विकत घेतली होती जी, जिथे त्यांनी आपले घर बांधले. या घरात लग्नानंतर जॅक्सन पत्नीसोबत राहत राहायचे. मात्र, नंतर आर्थिक अडचणींमुळे मायकल जॅक्सनने हे घर टॉम बराक यांना विकले.

हेही वाचा : 

प्रियांका चोप्राने एका पोस्टद्वारे केलं स्वतःचेच कौतुक

पॉप स्टार मायकल जॅक्सन यांना वाहनांची खूप आवड होती. त्याच्याकडे १४ महागड्या आणि आलिशान वाहनांचा संग्रह होता. २००९ मध्ये जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा मायकेल जॅक्सनकडे चार लिमोझिन, एक रोल्स रॉयस सिल्व्हर सराफ, रोल्स रॉयस सिल्व्हर स्पर II, लिंकन टाउन कार, कॅडिलॅक फ्लीटवुड, निओप्लान टूर बस, फोर्ड इकोनोलिन व्हॅन, GAC हाय सेरा फायर ट्रक आणि हार्ले डेव्हिडसन कीज होत्या.

मृत्यूपूर्वी मायकल जॅक्सन शोमधून मोठी कमाई करत असे. संगीताच्या रॉयल्टीच्या माध्यमातून ते कोट्यवधी रुपये कमावायचे. एक काळ असा होता जेव्हा तो एका आठवड्यात $२० मिलियन किंवा सुमारे ९७ कोटी रुपये कमावत असे. मात्र, जॅक्सनच्या मृत्यूनंतरही त्याने कमाई सुरूच ठेवली. २०१६-१७ च्या अहवालानुसार, मायकल जॅक्सनने ५२९ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. त्याच्या मृत्यूनंतरही मायकल जॅक्सन कमाईच्या बाबतीत अनेक वर्षे यादीत अव्वल स्थानावर राहिला.

दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होणार आणि तो शिवसेनेचाच होणार ; उद्धव ठाकरे

Latest Posts

Don't Miss