Mili Teaser: जाह्नवी कपूरच्या ‘मिली’चा टीझर पाहिलात?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही तिच्या स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. जान्हवीच्या ‘गुड लक जेरी’, 'रुही' आणि ‘धडक’ या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.

Mili Teaser: जाह्नवी कपूरच्या ‘मिली’चा टीझर पाहिलात?

Mili Teaser : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही तिच्या स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. जान्हवीच्या ‘गुड लक जेरी’, ‘रुही’ आणि ‘धडक’ या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. जान्हवीच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. जान्हवीचा मिली (Mili) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जान्हवी कपूरचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘मिली’ चा टीझर रिलीज झाला आहे. प्रेक्षकांना पुन्हा एकदा जान्हवीचा एक वेगळा अवतार पडद्यावर पाहायला मिळणार आहे. टीझरही सस्पेन्सने भरलेला आहे. या टीझरनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.

मिली हा चित्रपट २०१९ मध्ये रिलीज झालेल्या हेलन या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. जान्हवी कपूरचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट ४ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मथुकुट्टी झेवियर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

जान्हवीनं मिली या चित्रपटामधील लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. हा लूक शेअर करुन तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘एक तासामध्ये तिचं आयुष्य बदलणार आहे.’ त्यानंतर मिलीचा टीझर रिलीज झाला. टीझरमध्ये दिसत आहे की, जान्हवी एका फ्रिजर रुममध्ये अडकली आहे. या रुममधून बाहेर जाण्याचा प्रयत्न जान्हवी करत आहे. टीझरमध्ये विकी कौशलचा भाऊ सनी कौशल (Sunny Kaushal) देखील दिसत आहे. जान्हवी या चित्रपटात ‘मिली नौडियाल’ या २४ वर्षाच्या तरुणीची भूमिका साकारत आहे. तर अभिनेते मनोज पाहवा यांनी मिलीच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. हसलीन कौर, राजेश जैस या कलाकारांनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.

या चित्रपटात जान्हवी मिनी नौडियालची भूमिका साकारताना दिसणार आहे. मथुकुट्टी झेवियर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली आहे. विशेष म्हणजे जान्हवी पहिल्यांदाच तिच्या वडिलांसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ‘मिली’नंतर ती लवकरच राजकुमार रावसोबत ‘मिस्टर अँड मिसेस माही’मध्ये दिसणार आहे. यानंतर ती वरुण धवनसोबत ‘बावल’ चित्रपटात दिसणार आहे. जान्हवी वरुण धवनसोबत पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार आहे.

हे ही वाचा :

बॉलीवूड सिंगर बादशाह गुपचूप करत आहे या अभिनेत्रीला डेट, वर्षभरानंतर झाला खुलासा

Diwali 2022 : अगदी सोप्या पद्धतीत तुम्हला जमतील अशा खास मेहंदी डिझाइन्स

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात गटबाजीला सुरुवात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version