spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मिर्झापूर सिझन ३ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

अमेझॉन प्राईमवरील मिर्झापूर (Mirzapur) ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. या मालिकेला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले होते. या मालिकेचे २ भाग आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. तर या मालिकेची लोकप्रियता संपूर्ण भारतभर आहे. मिर्झापूरच्या चाहत्यांसाठी ही काही आनंदाची बातमी आहे. मिर्झापूरमधील गुड्डू भय्या या पात्राची भूमिका साकारणारा अभिनेता अली फजलने (Ali Fazal) मिर्झापूरच्या तिसऱ्या भागाची शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती त्याच्या इंस्टाग्रामच्या अधिकृत खात्यावर पोस्ट करत दिली आहे. त्यात त्याने मिर्झापूर ३ (Mirzapur 3) च्या कलाकार आणि क्रू सोबत एक सेल्फी घेतला आहे.

मिर्झापूर या मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय असलेल्या अमेझॉन प्राइम सीरिजच्या तिसऱ्या सीझनचे शूट या वर्षी जूनमध्ये सुरू झाले होते . आणि आता, सहा महिन्यांनंतर, कलाकार सदस्यांनी त्याचे शूटिंग पूर्ण केले आहे. मिर्झापूर हा सिझन मुख्य आणि संपूर्ण मिर्झापूवर ज्या कुटुंबाची सत्ता वर्षानुवर्ष चालत आली आहे असे त्रिपाठी यांच्यावर आधारीत आहे. त्रिपाठी हे मिर्झापूरचे लक्षाधीश असून कार्पेट निर्यातक आणि मिर्झापूरचे माफिया डॉन आहेत. त्याचा मुलगा मुन्ना, हा वडिलांची सत्ता त्याला मिळावी यासाठी भुकेलेला आहे आणि आपल्या वडिलांचा वारसा मिळवण्यासाठी तो अनेक चुकीचे पावलं उचलताना दाखवले आहे. यामध्ये मुन्ना हा एका लग्नाच्या वरातीत गोळीबार करतो . त्यात लग्नातील वर असलेल्या व्यक्तीचा मृत्यू होतो. नंतर त्या मुलाच्या घरातील सदस्य एका नामांकित वकील रमाकांत पंडित यांच्याकडे जातात कारण संपूर्ण मिर्झापूरमध्ये त्रिपाठींचा विरोध करण्याची ताकद फक्त या वकिलांमध्येच असते. रमाकांत पंडित एक उत्कृष्ट वकील असतात पण त्रिपाठींचा विरोध केल्यामुळे रमाकांत पंडित आणि त्यांच्या मुलांना गुड्डू आणि बबलू गुन्हेगारी मार्गाकडे वळावे लागले.

 

View this post on Instagram

 

A post shared by ali fazal (@alifazal9)

त्यानंतर गुड्डू आणि बबलू पंडित हे देखील कालांतराने त्रिपाठींसारखे मोठे माफिया बनतात. आणि त्यांच्यातील वाद वाढतो यात त्रिपाठींच्या मुलाला मुन्ना त्रिपाठी याची गुड्डू पंडित हत्या करतो. कारण मुन्ना त्रिपाठी याने गुड्डूच्या भावाची हत्या केलेली असते. तर त्या रंगात गुड्डू आणि त्याचे मित्र मिळून मिर्झापूरमधील माफिया त्रिपाठी आणि त्यांचा मुलगा मुन्ना या दोघांवरही गोळीबार करतात त्यात मुन्नाची हत्या होते तर त्रिपाठी त्याहल्ल्यातून वाचतात. आता येत्या सिझन ३ मध्ये नेमकं काय घडणार आहे हे बघण्यासारखं असणार आहे.

हे ही वाचा : 

शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीबाबत अंबादास दानवेंची प्रतिक्रिया

शिवशक्ती आणि भीमशक्ती यांच्या युतीवर दीपक केसरकारांचा टोला

सोनाली कुलकर्णीचे लंडन मधील काही खास फोटो

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss