spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Miss India Worldwide 2024: ध्रुवी पटेल बनली ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड २०२४’ची विजेती, आता बॉलिवूडमध्ये पदार्पणाची इच्छा

Miss India Worldwide 2024: ध्रुवी पटेल ही अमेरिकेत कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टमचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड २०२४’ ची विजेती ठरली आहे. ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड२०२४’ ही भारताबाहेर सर्वात जास्त काळ चालणारी भारतीय स्पर्धा आहे. या यशानंतर ती अतिशय खुश आणि उत्साही आहे. या स्पर्धेत यश मिळवल्यानंतर ध्रुवी पटेल हिने बॉलिवूडची अभिनेत्री आणि युनिसेफची ॲम्बेसेडर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

काय म्हणाली ध्रुवी ?
न्यू जर्सीतील एडिसन येथे मिस इंडिया वर्ल्डवाइडची विजेती घोषित झाल्यानंतर ध्रुवी म्हणाली की, ”मिस इंडिया वर्ल्डवाइडचा किताब जिंकणे हा एक अभूतपूर्व सन्मान आहे. हे फक्त एक मुकुट नसून त्यापेक्षाही खूप जास्त महत्त्वाचं आहे. मुकुटापेक्षा अधिक आहे. माझा वारसा, माझी मूल्ये आणि जागतिक स्तरावर इतरांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याची संधी यातून मिळेल.”

स्पर्धेतील इतर विजेत्यांची नावे
‘मिस इंडिया वर्ल्डवाइड २०२४’ या स्पर्धेत अनेक स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. मात्र ध्रुवी पटेल हिने सर्वांना मागे टाकून विजेती पद भूषवलं आहे. सुरीनामच्या लिसा अब्दोएलहकला ‘फर्स्ट रनर अप’ घोषित केले गेले, तर नेदरलँडच्या मालविका शर्माला ‘सेकंड रनर अप’ म्हणून घोषित करण्यात आले. त्याचसोबत ‘मिसेस’ गटात त्रिनिदाद आणि टोबॅगोची सुसान माउटेट विजेती तर स्नेहा नांबियार ‘फर्स्ट रनर अप’ आणि ब्रिटनची पवनदीप कौर ‘सेकंड रनर अप’ ठरली. तर ‘टीन’ गटात ग्वाडेलूपच्या सिएरा सुरेटला ‘मिस टीन इंडिया वर्ल्डवाइड’चा मुकुट बहाल करण्यात आला. नेदरलँडची श्रेया सिंग आणि सुरीनामची श्रद्धा टेडजो यांना अनुक्रमे ‘फर्स्ट’ आणि ‘सेकंड रनर अप’ घोषित करण्यात आले. ही स्पर्धा न्यूयॉर्कमधील ‘इंडिया फेस्टिव्हल कमिटी’ने आयोजित केली होती. या स्पर्धेच्या भारतीय-अमेरिकन नीलम आणि धर्मात्मा सरन या अध्यक्षा आहेत. मागील ३१ वर्षांपासून ही स्पर्धा सुरु आहे.

हे ही वाचा:

PM Modi महाराष्ट्राला देणार भेट, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

चैत्यभूमीवर जाऊन महामानव आंबेडकरांच्या स्मृतिस्थळासमोर नाक घासा, एवढे तरी करा..Naresh Mhaske यांचं Rahul Gandhi यांना पत्र

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss