spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

  मिथिला पालकर झळकणार ‘या’ तमिळ चित्रपटात,पोस्ट शेअर करत दिली माहिती

मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर हिने आपल्या अभिनयाने तर प्रेक्षकांच्या मनात घर केलंच आहे.

मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर हिने आपल्या अभिनयाने तर प्रेक्षकांच्या मनात घर केलंच आहे.मात्र तिने तिच्या सौंदर्याने देखील तरुणाईना भूरळ पाडली आहे.मिथिलाने मराठीसिनेसृष्टीसह बॉलीवूडमध्ये देखील आपली छाप सोडली आहे.मराठी-हिंदीत कामकरण्याबरोबरच मिथिला आता तामिळ चित्रपटांमध्ये झळकणार आहे.नुकतेच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.यावेळी मिथिला चित्रपटाच्या टीम सोबत उपस्थित होती.‘ओहो एन्थान बेबी’या तामिळ चित्रपटातून मिथिला तामिळ सिनेसृष्टीत प्रवेश करणार आहे.

तामिळ चित्रपटातील पदार्पणाबद्दल बोलताना मिथिला म्हणाली की, “मला साउथमध्ये काम करायला खूप आवडते, तेलुगू सिनेमातील माझा अनुभव अप्रतिम आहे. आता ‘ओहो एन्थान बेबी’ मधून मी तमिळमध्ये पदार्पण करणार आहे. मिथिलाने पुढे म्हटले की,  तामिळ चित्रपटात  काम करत असताना  आनंद, उत्साह असून दुसरीकडे काहीसं दडपण वाटत आहे. मी आता या चित्रपटाबद्दल फार काही सांगू शकत नाही, पण प्रेक्षकांना फार काळ प्रतीक्षा करायला लावू शकत नाही असेही मिथिला पालकरने म्हटले. 

कृष्णकुमार रामकुमार यांनी ‘ओहो एन्थान बेबी’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रोमियो पिक्चर्स, विष्णू विशाल आणि डी कंपनी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपटाचे संगीत  दरबुका सिवा यांनी दिले आहे. यापूर्वी त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी लोकप्रिय ठरली होती. 

मिथिला पालकरने ‘गर्ल इन द सिटी’ आणि नेटफ्लिक्सच्या ‘लिटिल थिंग्ज’या सीरिजमध्ये काम केले आहे.मिथिलाने 2015 मध्ये मराठी भाषेतील माझं हनीमून या लघुपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.निखिल आडवाणी यांचा कट्टीबट्टी हा मिथिलाचा पहिला चित्रपट होता. त्याशिवाय,  2018 मध्ये आलेल्या कारवाँ या चित्रपटातील तिच्या कामाचे कौतुक झाले आहे. 2017 मधील मुरांबा या मराठी चित्रपटात तिने काम केले. मिथिलाला तिच्या अभिनयासाठी विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

मिथिलाची सुरुवात सोशल मीडियावरील तिच्या टॅलेंन्टने केली.त्यावेळी तिचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.मिथिला सोशल मीडियावर कायम सक्रिय असते ती तिचे व्हिडिओ आणि पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते.मिथिलाचा चाहता वर्ग देखील बराच मोठा आहे.

 

हे ही वाचा: 

पाठीच्या ‘या’ भागात दुखणे धोकादायक आहे!, जाणून घ्या सविस्तर…

पुण्यात एकाच दिवशी चाकू हल्ल्याच्या दोन घटना, तीन व्यक्ती जखमी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss