अभिनेते मिथुन चक्रवती यांना ब्रेनस्ट्रोक,कोलकात्याच्या अपोलो रुग्णालयात दाखल

बॉलीवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृत्ती संबंधित एक धक्कादायक बातमी समोर येत आहे...मिथुन यांची प्रकृती अचानक खालावली आहे.

अभिनेते मिथुन चक्रवती यांना ब्रेनस्ट्रोक,कोलकात्याच्या अपोलो रुग्णालयात दाखल

बॉलीवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृत्ती संबंधित एक धक्कादायक बातमी समोर येत आहे…मिथुन यांची प्रकृती अचानक खालावली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना आज १० फेब्रुवारी शनिवार रोजी कोलकाता येथील अपोलो रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर आल्यापासून चाहते त्यांच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. सध्या तरी मिथुन यांच्या  कुटुंबीयांकडून त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मागील काही दिवसांपासून ते ‘शास्त्री’ या सिनेमाचं शुटींगमध्ये देखील ते व्यस्त होते.
मिथुन चक्रवर्ती हे आता ७३ वर्षांचे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मिथुन चक्रवर्ती यांना मध्यरात्री स्ट्रोक आला. त्यानंतर त्यांना तात्काळ कोलकाता येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अपोलो हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये त्यांना ठेवण्यात आलं. न्यूरोसर्जन डॉ. संजय भौमिक अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यावर उपचार करत आहेत. सध्या तरी या दिग्गज अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. नुकतेच मिथुन यांना चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी देशाच्या प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

याआधी २०२२ मध्ये देखील मिथुन चक्रवर्तीचा हॉस्पिटलमधून एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यानंतर चाहते नाराज झाले होते. अनेक प्रकारच्या अफवाही पसरवल्या गेल्या. त्यानंतर त्यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती याने वडिलांच्या तब्येतीची माहिती दिली. वडिलांच्या किडनीमध्ये स्टोन असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.त्यामुळे आता ते बरे होण्याची त्यांचे वाट पाहत आहेत.मिथुन यांनी ९०च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेली आहे.त्यांच्या अभिनयाचे पैलू आपण सगळ्यांनीच पाहिले आहेत.वयाच्या ७३व्या वर्षी देखील ते या क्षेत्रात काम करत आहेत.सध्या त्यांच्या शास्त्री या सिनेमाचं शुटिंग सुरु आहे.

हे ही वाचा: 

पुण्यातील ‘निर्भय बनो’ कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ, निखिल वागळेंवर हल्ला

मुंबईच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक, असे करा प्रवासाचे नियोजन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version