बहुप्रतिक्षित मॉनस्टर: द जेफरी डॅमर स्टोरी लवकरच नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित

हा चित्रपट मर्यादित एपिसोड्ससह प्रदर्शित होणार असून २१ सप्टेंबर रोजी त्याचा प्रीमियर होणार आहे.

बहुप्रतिक्षित मॉनस्टर: द जेफरी डॅमर स्टोरी लवकरच नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित

सर्व ओटीटी प्रेमींसाठी एक चांगली बातमी आहे की बहुप्रतीक्षेत अमेरिकन आत्मचरित्रात्मक नाट्य Dahmer: Monster: The Jeffery Dahmer story लवकरच नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मर्यादित एपिसोड्ससह प्रदर्शित होणार असून २१ सप्टेंबर रोजी त्याचा प्रीमियर होणार आहे.

हा चित्रपट अमेरिकन सिरिअल किलर जेफ्री लिओनेल डॅमरच्या आयुष्यावर आधारित आहे. डॅमर याने १७ मुलांचा निर्घृणपणे खून केल्यामुळे डॅमरला मुलांचा खुनी म्हटले जायचे. ही सीरिज डॅमरच्या जाळ्यात अडकलेल्या किंवा त्यांना बळी पडलेल्या लोकांचा दृष्टिकोन लोकांसमोर मांडणार आहे. आपल्या उत्कृष्ट आणि परिपूर्ण कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या इव्हान पीटरची उत्तम कामगिरी या चित्रपटातून पाहता येणार आहे. इव्हान पीटर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, रायन मर्फी आणि इयान ब्रेनन हे ह्या सिनेमाचे सह – निर्माते आहेत. या चित्रपटाची घोषणा होण्याआधी नेटकरी सिरिअल किलरशी संबंधित विविध मालिका आणि चित्रपट पाहत होते. मात्र, डॅमर आणि माय फ्रेंड डॅमर ह्या लोकांच्या वॉचलिस्टमधील सतत पहिल्या जाणाऱ्या मालिकांपैकी एक आहेत.

कोण आहे जेफ्री लिओनेल डॅमर?

डॅमर हा एक सिरीअल किलर होता ज्याने १७ मुलांना बेदम मारहाण केली. हत्येनंतरही हा सीरियल किलर मृतदेहासोबत गैरवर्तन करायचा. त्याचबरोबर तो मुलांचे लैंगिक शोषण देखील करत असे. डॅमर हा एक सिरीअल किलर तर होताच पण, त्याबरोबर तो एक नरभक्षक म्हणूनही ओळखला जात होता.

Dahmer काय आहे?

डॅमर (Dahmer) हा २००२ मध्ये रिलीज करण्यात आलेला सिरिअल किलिंगवर आधारित अमेरिकन चित्रपट आहे. यामध्ये एक सिरिअल किलर कसा जन्माला येतो आणि तो कसा जगभर एक कुप्रसिद्ध सिरिअल किलर बनतो हे मांडले आहे. चित्रपटाची कथा कथकथनाच्या स्वरूपात मांडली आहे, ज्यात रॉडनी हे पीडितेच्या नाव आहे. डेव्हिड जेकबसन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून जेकबसन आणि डेव्हिड बिर्के यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. पण, आश्चर्याची बाब म्हणजे कोणत्याही ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मने हा चित्रपट रिलीज केला नाही.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांनी राजकारणापेक्षा प्रशासनाकडे लक्ष द्यावे ; आदित्य ठाकरेंचा टोला

‘… आरोप खोटे ठरल्यास काय कराल, पत्राचाळ घोटाळा आरोपांवर शरद पवारांचं स्पष्टीकरण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version