बॉलिवूडवर पसरली शोककळा; ‘रेडी’ चित्रपटाचे निर्माते नितिन मनमोहन यांचं निधन

सरत्या वर्षात बॉलिवूड जगतातून एक दु:खद बातमी समोर येते आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितिन मनमोहन (Nitin Manmohan) यांचे आज दुःखद निधन झाले आहे.

बॉलिवूडवर पसरली शोककळा; ‘रेडी’ चित्रपटाचे निर्माते नितिन मनमोहन यांचं निधन

सरत्या वर्षात बॉलिवूड जगतातून एक दु:खद बातमी समोर येते आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितिन मनमोहन (Nitin Manmohan) यांचे आज दुःखद निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच नितिन मनमोहन यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारात प्रतिसाद मिळत नसल्यामुळे काही दिवस त्यांना व्हेटिंलेटरवर देखील ठेवण्यात आले होते. त्यानंतर आज त्यांचे निधन झाली आहे

नितीन मनमोहन हे चित्रपटातील प्रसिद्ध खलनायक मनमोहन यांचं पुत्र होते. ज्यांना ‘ब्रह्मचारी’, ‘गुमनाम’ आणि ‘नया जमाना’सह अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात. वडिलांप्रमाणे नितीन मनमोहनही चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या चित्रपटांची निर्मिती केली. यामध्ये ‘बोल राधा बोल’ (१९९२), ‘लाडला’ (१९९४), ‘यमला पगला दीवाना’ (२०११), ‘आर्मी स्कूल’, ‘लव के लिए कुछ भी करेगा’ (२००१), ‘दस’ (२००५) यांचा समावेश आहे. , ‘चल मेरे भाई’ (२००१), ‘महा-संग्राम’ (१९९०), ‘इन्साफ: द फायनल जस्टिस’ (१९९९७), ‘दिवांगी’, ‘नई पडोसन’ (२००३), ‘अधर्म’ (१९९२), ‘ बागीमध्ये ‘ईना मीना दीका’, ‘अस्तू’, ‘टँगो’सारख्या अनेक मोठे चित्रपटांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्राला धोका, मंत्र्यांना खोका… आजही महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

‘उध्दवजी,एकांतात दिलेला शब्द पाळत नाही…’ ट्विट द्वारे शीतल म्हात्रेचा ठाकरेंवर निशाणा, पहा काय म्हणाल्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version