spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

२० जानेवारीला साजरा होणार मूवी लव्हर्स डे, ‘अवतार २’ सह हे चित्रपट पहा फक्त ९९ रुपयात

हॉलिवूडचा ब्लॉकबस्टर अवतार २ पाहायची इच्छा असलेले चाहते या प्रसंगी केवळ रु.९९ मध्ये चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट पाहू शकतात.

अवतार: द वे ऑफ वॉटर हा हॉलिवूड चित्रपट जगभर प्रचंड कमाई करत आहे. परदेशातच नाही तर भारतातही या चित्रपटाला प्रचंड पसंती मिळत आहे. हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमरून दिग्दर्शित या चित्रपटाचे बजेट सुमारे २००० कोटी रुपये आहे. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट २०२२ च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. पण ज्यांनी अजून अवतार २ पाहिला नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

सिनेप्रेमींसाठी खास प्रसंग

खरं तर, २० जानेवारी २०२३ हा सिनेमा प्रेमी दिन म्हणजे मूवी लव्हर्स डे म्हणून साजरा केला जाणार आहे. या खास प्रसंगी प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हॉलिवूडचा ब्लॉकबस्टर अवतार २ पाहायची इच्छा असलेले चाहते या प्रसंगी केवळ रु.९९ मध्ये चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट पाहू शकतात. जेम्स कॅमेरॉनचा अवतार: द वे ऑफ वॉटर या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडले असून भारतातील प्रेक्षकांची हा चित्रपट पहिली पसंती ठरला आहे. या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून चित्रपटाने ५०० कोटींची कमाई केली आहे. एवढेच नाही तर या चित्रपटाने भारतात आतापर्यंत ४७० कोटींचा टप्पा पार केला आहे.

ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत आयनॉक्सने लिहिले, हा शुक्रवार मूव्ही लवर्स डे स्टाईलमध्ये साजरा करा! तुमच्या चित्रपटाची तिकिटे #INOX वर फक्त ९९ रुपयात बुक करा आणि दृष्यम २ सह रुपेरी पडद्यावरील जादू अनुभवा. आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडूमध्ये जीएसटीसह तिकिटांची किंमत १०० रुपये ठेवण्यात आली आहे. तर तेलंगणामध्ये हीच किंमत ११२ आहे. या ऑफरमध्ये प्रेक्षक कुत्ते, दृष्यम २, वारीसू, वीरैया, अवतार २, द कश्मीर फाईल्स, भेडिया, उंचाई सारखे सिनेमे पाहू शकतात.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मल्टिप्लेक्सने राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला, ज्यामध्ये तिकीटाची किंमत ७५ रुपये करण्यात आली होती. कोरोना विषाणूच्या साथीमुळे चित्रपटगृहांमधील मंदीचा सामना करण्यासाठी आणि लोकांना चित्रपटगृहांना भेट देण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात आला, जो खूप यशस्वी झाला. लाखो लोकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिले. मल्टिप्लेक्स असोसिएशनने सांगितले होते की राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त ६५ लाखांहून अधिक लोकांनी चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट पाहिला होता.

हे ही वाचा:

“तर मी स्वतःला फाशी लावून घेईन” लैंगिक शोषणाच्या आरोपांवर बृजभूषण सिंहांनी दिली प्रतिक्रिया

आम्ही त्यावर योग्यवेळी योग्यरितीने बोलूच, सत्यजित तांबेंचं मोठं विधान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss