spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“माझिया प्रियाला प्रित कळेना” मालिकेतील अभिनेत्रीचा पुन्हा कमबॅक ?

करिअरच्या शिखरापर्यंत असताना तिने सिनेसृष्टीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. तिने लग्न करुन थेट अमेरिका गाठली. त्यामुळे तिच्या कमबॅकची चाहता वर्ग वाट पाहत होता. पण आता एका पोस्ट मुळे ती पुन्हा एकदा कमबॅक करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

२०१० मध्ये झी मराठीवर “माझिया प्रियाला प्रित कळेना” ही मालिका सुप्रसिद्ध झाली. त्या मालिकेत मराठमोळी मुलगीमृणाल दुसानिस(Mrunal Dusanis) या अभिनेत्रीने मुख्य भुमिका साकरली होती. त्यानंतर “तु तिथे मी”, “अस्स सासरं सुरेख बाई”अशा एकापेक्षा एक मालिकांमध्ये तिने काम केले. छोट्या पडद्यावर काम करत तिने आपला चाहता वर्ग तयार केला.मात्र करिअरच्या शिखरापर्यंत असताना तिने सिनेसृष्टीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. तिने लग्न करुन थेट अमेरिका गाठली. त्यामुळे तिच्या कमबॅकची चाहता वर्ग वाट पाहत होता. पण आता एका पोस्ट मुळे ती पुन्हा एकदा कमबॅक करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

अनेक वर्षांपासून अमेरिकेत राहिलेली मृणार भारतात पुन्हा आली. भारतात परतल्यावर तिने अनेक माध्यमांशी संवाद साधत मुलाखत देखील दिली. त्यात तिने “मला लवकरच काम करायला आवडेल.”असं ती म्हणाली होती. मराठी सिरियल ऑफिशियल या इन्स्टाग्राम च्या अधिकृत मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) हिच्या सोबत एक फोटो पोस्ट केल्याने मृणाल पुन्हा एकदा मराठी मालिकेत येणार या चर्चांना उधाण आलं आहे.

मराठी सिरियल ऑफिशियल या इन्स्टाग्राम च्या अधिकृत या अकाऊंटवर मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) हिचा फोटो पोस्ट करत “अँड वी आर बॅक ऑन द सेट”असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे तब्बल ४ वर्षांनंतर भारतात आलेली ही अभिनेत्री कोणत्या मालिकेत झळकणार ? हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान, आता मृणाल ही कायमस्वरुपी भारतातच राहणार असल्याचं समजतं आहे. मात्र मालिका कि नाटक नक्की कोणत्या क्षेत्रात पुनरागन होणार हे गुपित आहे.

Chhagan Bhujbal ला दोन समाजामध्ये भांडणं लावायची आहेत: Manoj Jarange Patil

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss