अंदमानची टूर आणि दुरावा,प्रथमेशला भेटण्यासाठी मुग्धाची लगबग

गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे.

अंदमानची टूर आणि दुरावा,प्रथमेशला भेटण्यासाठी मुग्धाची लगबग

गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे.सारेगमप लिटिल चॅम्पस मधुन ओळख,मैत्री आणि प्रेम असा सुरु झालेला प्रवास लग्नापर्यंत येऊन पोहचला. या दोघांचा विवाहसोहळा निसर्गाच्या सानिध्यात कोकणात २१ डिसेंबर २०२३ रोजी पार पडला होता. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.लग्नानंतरचे अनेक व्हिडिओ प्रथमेश-मुग्धा सोशल मीडियावर शेअर करत होते.मात्र लग्नानंतर ही हे दोघ कुठे फिरायला जाणार याची उस्तुकत्ता प्रेक्षकांमध्ये होती,मात्र मुग्धा तिच्या कामाच्या निमित्ताने एकटीच अंदमान दौऱ्यावर गेली होती.

अंदमान दौऱ्यावर एकटीच गेल्याने गेल्या काही दिवसांपासून या दोघांनीही एकमेकांची आठवण येत असल्याच्या अनेक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केल्या होत्या.तसचं अंदमान मधील प्रत्येक अपडेट ती सोशल मीडियावर शेअर करत होतीच.आता मुग्धा ६ दिवसांच्या दौऱ्यानंतर अखेर पुन्हा घरी परतली आहे.अंदमानच्या परतीच्या प्रवासाचा खास व्हिडीओ मुग्धाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.६ दिवसांनी घरी परतत असल्याने मुग्धा प्रचंड आनंदी असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.या व्हिडिओमध्ये मुग्धाने असं म्हंटलं आहे की,मी माझी अंदमानची टूर पुर्ण केली असून आता पुण्याला घरी जाण्यासाठी बॅग भरत आहे.

लग्नानंतर पहिल्यांदाच मी ६ दिवस टूरला आले होते,त्यामुळे मी आता पुन्हा घरी जायला आणि प्रथमेशला भेटायला उस्तुक आहे.त्यामुळे घरी येण्यासाठी बॅग भरण्याची तिची लगबग सुरु असल्याचं दिसून येत होत.त्यानंतर ती अंदमान विमानतळावर पोहचते तिथले काही दृश्य दाखवते.त्यानंतर तिथुनच ती आई बाबा ,सासु सासरे ,बहिण मृदुल आणि नवरा प्रथमेश साठी कुकीज भेट म्हणुन घेते.यानंतर ती पुण्यात पोहचते आणि तिथे प्रथमेश तिला घ्यायला आलेला असतो. आणि ६ दिवसांनी एकमेकांना पाहयल्यामुळे दोघानाही खुु आनंद होतो.आणि दोघांनीही तो आनंद तो क्षण मोबाईलमध्ये कैद करावा वाटतो त्यामुळे  दोघही एकमेकांचा व्हिडिओ काढत होते.दरम्यान या व्हिडिओवर कलाविश्वातून आणि त्यांच्या चाहत्यांकडून लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे

 

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील किल्ल्यांचा युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव – Cm Eknath Shinde

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version