spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बिग बॉस १७ चा विजेता मुनव्वर फारुकीचा चाहता अडचणीत,FIR दाखल,नेमंक घडलं काय?

टेलिव्हिजनवरील बिग बॉस १७ या लोकप्रिय कार्यक्रमाने नुकताच निरोप घेतला आहे.या पर्वाचा विजेता पद मुनव्वर फारुकीला मिळाले आहे.

टेलिव्हिजनवरील बिग बॉस १७ या लोकप्रिय कार्यक्रमाने नुकताच निरोप घेतला आहे.या पर्वाचा विजेता पद मुनव्वर फारुकीला मिळाले आहे.अशातच तो आता त्याची ती मानाची ट्रॉफी घेऊन डोंगरीत त्याच्या राहत्या ठिकाणी गेला होता.त्यावेळी डोंगरीत त्याचे दणक्यात स्वागत करण्यात आले.रस्त्यावर खुप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती,अशावेळी मुंबईतील डोंगरी भागात रोड शो केला होता. यावेळी बेकायदेशीरपणे ड्रोनचा वापर करण्याची माहिती समोर येत आहे. कोणत्याही परवानगीशिवाय रोड शोमध्ये ड्रोनचा वापर केल्याने मुनव्वरच्या चाहत्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.बिग बॉस हा लोकप्रिय शो जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकी ट्रॉफी घेऊन डोंगरी भागात आला होता. यावेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. या गर्दीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

सोमवारी, मुंबईच्या डोंगरी पोलिसांनी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल बिग बॉस 17 मध्ये मुनावर फारुकीच्या विजयी रॅलीवेळी ड्रोन उडवणाऱ्या ऑपरेटरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ड्युटी कॉन्स्टेबलने एका व्यक्तीला ड्रोन कॅमेरा वापरून सेलिब्रेशन टिपताना पाहिले. अरबाज युसूफ खान हा ड्रोन उडवत होता. पोलिस अधिकारी शिंदे आणि पीएसआय मुल्ला यांनी ऑपरेटरजवळ जाऊन त्याच्याकडे योग्य परवानग्या असल्याबद्दल विचारपूस केली. खानने कबूल केले की त्याच्याकडे आवश्यक अधिकृतता नाही. त्यामुळे पोलिसांनी खानचा ड्रोन कॅमेरा जप्त केला.

 पोलिस अधिकाऱ्यांनी ड्रोनच्या वापराबाबत मुंबई पोलिस आयुक्तांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल याशिवाय सार्वजनिक सुरक्षांचे पालन न केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.दरम्यान बीग बॉसच्या घरात 15 आठवडे टिकून राहिल्यानंतर मुनाव्वर बिग बॉस 17 चा विजेता झाला. ट्रॉफीसह त्याला 50 लाखांचे रोख बक्षीस आणि एक नवीन ह्युंदाई कार भेट घेतली.मुनव्वर हा बिग बॉसच्या घरात नेहमीचं वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.तर यावेळी बिग बॉसच्या घरात मुनव्वरची एक्स गर्लफ्रेंड आली होती. तिने मुनव्वरवर धोका दिल्याचा, टू-टायमिंग करण्याचा आरोप केला होता.अशा अनेक वादांना फेटाळत मुनव्वरने त्या ट्रॉफीवर स्वत:चे नाव कोरले आहे.

हे ही वाचा:

वाचनप्रेमींसाठी पर्वणी, ‘या’ तारखेला मुंबईत होणार मुंबई शहर ग्रंथोत्सव

वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदू पक्षकारांना पूजा करण्याचे जिल्हा न्यायालयाने दिले आदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss