spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीचा मानकरी ठरला मुनव्वर फारुकी,खास पोस्ट केली शेअर

टेलिव्हिजनवरील बिग बॉस १७ हा कार्यक्रम मागच्या वर्षी १५ ऑक्टोबरला सुरु झाला आहे.या कार्यक्रमाचा काल महाअंतिम सोहळा पार पडला आहे.

टेलिव्हिजनवरील बिग बॉस १७ हा कार्यक्रम मागच्या वर्षी १५ ऑक्टोबरला सुरु झाला आहे.या कार्यक्रमाचा काल महाअंतिम सोहळा पार पडला आहे. या अनेक महिन्यात  बिग बॉस १७ च्या घरात मोठा ड्रामा,राडा आणि भांडण आपल्याला पाहायला मिळाले.दरम्यान आता अखेरीस या पर्वाचा विजेता घोषित करण्यात आला आहे.. तर बिग बॉस १७ च्या ट्रॉफीचा मानकरी मुनव्वर फारुकी ठरला आहे. मुनव्वरला त्याच्या वाढदिवशी चाहत्यांनी मोठं गिफ्ट दिलं आहे. 

विनोदवीर मुनव्वर फारुकी बिग बॉस १७ चा विजेता ठरला आहे. पहिल्या दिवसापासूनच हुशारीने खेळणारा आणि मोठा चाहतावर्ग असणारा हा स्पर्धक आज BB17 ची ट्रॉफी घेऊन जात आहे. बिग बॉस १७ च्या अंतिम फेरीत पाच स्पर्धक होते.त्यात मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, अरुण माशेट्टी, अभिषेक कुमार आणि मन्नारा चोप्रा हे स्पर्धक टॉप ५ मध्ये पोहोचले होते. त्याआधी टॉप ६ मध्ये अंकिताचा नवरा विकी जैनही पोहोचलेला. मात्र प्रेक्षकांच्या कमी मतामुळे त्याला घराबाहेर जावे लागले. दरम्यान आता बिग बॉस १७ चा विजेता मिळाला आहे.

बिग बॉस १७ या शो मध्ये जवळ जवळ १७ स्पर्धक सहभागी झाले होते.केवळ अनुराग डोभाल, खानजादी आणि ऑरा हे तीन स्पर्धक ग्रँड फिनाले सोहळ्यात दिसले नाहीत. अगदी काहीच दिवसांपूर्वी अनुरागने असा आरोप केलेला की, बिग बॉसचा हा खेळ आधीपासूनच फिक्स आहे. शिवाय त्याने ट्विटरवरही या खेळाबद्दल नाराजी व्यक्त करत सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते.

दरम्यान मुनव्वर फारुकीने ट्रॉफी आणि सलमान खानसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,”तुम्हा चाहत्यांचे खूप-खूप आभार. तुमचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे ‘बिग बॉस’ची ट्रॉफी डोंगरीत आली आहे. सलमान खानचे विशेष आभार. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य नव्हतं. सर्वांचे मनापासून आभार”. मुनव्वरच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.दरम्यान बिग बॉस १७ च्या ट्रॉफीवर मुनव्वरने नाव कोरलं आहे. तर अभिषेक कुमार उपविजेता ठरला आहे. ‘बिग बॉस 17’चा विजेता ठरलेल्या मुनव्वरला ट्रॉफीसह 50 लाख रुपये आणि आलिशान कार भेट म्हणून मिळाली आहे.

हे ही वाचा:

VBA SUJAT AMBEDKAR यांची मुंबईत जन संवाद यात्रा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून नाशिक दौऱ्यावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss