मुन्ना आणि सर्किट तुरुंगात, १६ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार संजय दत्त आणि अरशद वारसी

संजय दत्त या अनटाइटल्ड चित्रपटाची निर्मिती करणार असून सिद्धांत सचदेव याचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

मुन्ना आणि सर्किट तुरुंगात, १६ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार संजय दत्त आणि अरशद वारसी

संजय दत्त आणि अर्शद वारसी ही जोडी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. जेव्हा-जेव्हा हे दोन कलाकार मोठ्या पडद्यावर एकत्र आले आहेत तेव्हा तेव्हा त्यांनी प्रेक्षकांना हसायला भाग पाडले आहे. सुपरहिट फ्रँचायझी ‘मुन्ना भाई’च्या या जोडीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच प्रेक्षकांना ‘मुन्ना’ आणि ‘सर्किट’ची ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

फिल्म समीक्षक तरण आदर्श यांनी इन्स्टाग्रामवर अर्शद वारसी आणि संजय दत्तच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. या पोस्टरमध्ये ‘मुन्ना’ आणि ‘सर्किट’ दोघेही कैद्यांच्या कपड्यात तुरुंगात बंद झालेले दिसत आहेत. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप जाहीर झालेले नाही. संजय दत्त या अनटाइटल्ड चित्रपटाची निर्मिती करणार असून सिद्धांत सचदेव याचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. हे दोन्ही कलाकार २००७ मध्ये ‘धमाल’ चित्रपटातसुद्धा दिसले होते. अशा परिस्थितीत तब्बल १६ वर्षांनंतर दोघे पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहेत.

संजय दत्तनेही या चित्रपटाचे पोस्टर त्याच्या सोशल साइटवर शेअर केले आहे. शीर्षक नसलेल्या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना संजय दत्तने इंस्टाग्रामवर लिहिले की, “आम्ही पुन्हा एकत्र येण्याची आतुरतेने वाट पाहत होतो, पण आता प्रतीक्षा संपली आहे. मी माझा मित्र अर्शद वारसीसोबत एक नवीन चित्रपट घेऊन येत आहे. हा चित्रपट तुमच्यापर्यंत आणण्यासाठी मी प्रतीक्षा करू शकत नाही.” संजयच्या या घोषणेनंतर चाहते खूप खुश झाले आहेत.

संजय दत्त आणि अर्शद वारसीची जोडी राजकुमार हिरानीच्या सुपरहिट फ्रेंचाइजी ‘मुन्ना भाई’मध्ये दिसली होती. २००३ मध्ये रिलीज झालेला ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ आणि २००६ मध्ये रिलीज झालेला ‘लगे रहो मुन्ना भाई’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. या दोन्ही चित्रपटांनी अर्शद वारसी तसेच बोमन इराणी यांचे नशीब पालटले. हे दोन्ही चित्रपट आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत.

हे ही वाचा:

जितेंद्र आव्हाडांनी दिला इशारा, सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही

प्रजासत्ताक दिनी सनी देओलच्या ‘Gadar 2’ चा फर्स्ट लूक समोर आला, जाणून घ्या चित्रपटाची रिलीज डेट?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version