“घर, बंदूक, बिरयाणी” चित्रपटाच्या निमित्ताने, नागराज मंजुळे आणि आकाश थोसर सैराटनंतर पुन्हा एकत्र

“घर, बंदूक, बिरयाणी” चित्रपटाच्या निमित्ताने, नागराज मंजुळे आणि आकाश थोसर सैराटनंतर पुन्हा एकत्र

अभिनेते व दिग्दर्शक नागराज मंजुळेचा सिनेमा म्हटलं की काहीतरी वेगळा विषय हे ठरलेलच आहे. नागराज यांनी ‘झुंड’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नसली तरी समीक्षक आणि विविध कलाकारांकडून शाबासकी मात्र मिळवली. केवळ मराठीच नाही तर बॉलिवूड आणि दक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार्सनी या सिनेमाचं कौतुक केलं होतं.

आता नागराज मंजुळे हे आणखी एका सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा सिनेमा मराठी-हिंदीसह इतर दोन दाक्षिणात्य भाषांमध्ये प्रसिद्ध होणार आहे. ‘नागराज पोपटराव मंजुळे’ आणि ‘झी स्टुडिओज’ची निर्मिती असणाऱ्या या सिनेमाचं नावच भन्नाट आहे. हा ‘घर बंदुक बिरयानी’ या हटके नावाचा सिनेमा असणार आहे. गेल्यावर्षीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा हेमंत जंगल अवताडे यांच्याकडे आहे.

हेही वाचा : 

Drishyam 2 : प्रेक्षकांना खास दिवाळी भेट; ‘दृश्यम 2’ वर निर्मात्यांनी दिली बंपर ऑफर

दिवाळीच्या दोन दिवस आधी नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावर सिनेमाचं पोस्टर शेअर करत २५ ऑक्टोबरला टीझर घेऊन येतोय असं म्हटलं होतं. आणि आज सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे.सैराट नंतर पुन्हा एकदा नागराज आणि आकाश ठोसर एकत्र दिसणार आहे. झुंडमध्येही आकाश ठोसरनं छोटी भूमिका साकारली होती. मात्र प्रत्यक्ष सैराटनंतर नागराज आणि आकाश दुसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत. या दोघांच्या जोडीला अभिनेते सयाजी शिंदे यांच्या अभिनयाचा तडकाही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

सिनेमाच्या टीझरमध्ये नागराज मंजूळे आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसत आहेत. तर सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर दहशतवाद्यांच्या भूमिकेत आहेस असं म्हणावं लागेल. टीझरमध्ये कलाकारांच्या तोंडी एकही संवाद नाहीये पण सुरू असलेली चकमक प्रेक्षकांना धरून ठेवत आहेत. दरम्यान सयाजी शिंदे यांच्या कॉमेडिची छोटी झलकही पाहायला मिळतेय. इतकंच नाही तर सिनेमाचं टायटल साँगही फारच कॅची आहे. सिनेमाची रिलीज डेट अद्याप घोषित करण्यात आलेली नाहीये. टीझर पासून सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे.

Solar Eclipse 2022 : सूर्यग्रहणामुळे मंदिर बंद राहणार

Exit mobile version