नागराज मंजुळेंचा ‘घर बंदुक बिर्याणी’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

नागराज मंजुळेंचा ‘घर बंदुक बिर्याणी’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Ghar Banduk Biryani : नागराज मंजुळेंचा ‘घर बंदुक बिर्याणी’ (Ghar Banduk Biryani) हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, काही महिन्यापूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती आणि या चित्रपटाची प्रेक्षकांना भरपूर उसुक्ता लागली आहे. नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.

घर बंदुक बिर्याणी (Ghar Banduk Biryani) या चित्रपटाची निर्मिती नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा जंगल अवताडेने सांभाळली आहे. या चित्रपटात नागराज मंजुळे डबल रोल (Double) भूमिकेत दिसणार आहे. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची निर्मिती सोबत या चित्रपटामध्ये अभिनय देखील केला आहे.

 

या चित्रपटामध्ये सयाजी शिंदे, आकाश ठोसर , नागराज मंजुळे हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. घर बंदुक बिर्याणी हा चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि हा चित्रपट मराठी (Marathi), हिंदी (Hindi), तामिळ (Tamil), तेलुगू (Telugu) या भाषेत प्रदर्शित होणार आहे.

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) हे नेहमी काहींना काही नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतात. नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी या अगोदर फॅंड्री, सैराट, नाळ यांसारखे सुपरहिट आणि चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत. आणि आता ते घर बंदुक बिर्याणी (Ghar Banduk Biryani) हा वेगळा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. या चित्रपटा मध्ये प्रेक्षकांना काय तरी नवीन आणि वेगळ पाहायला मिळणार आहे.

 

घर बंदुक बिर्याणी (Ghar Banduk Biryani) या चित्रपटाबद्दल नागराज मंजुळे म्हणाले की घर बंदुक बिर्याणी या चित्रपटाचे शूटिंग संपले आहे, आणि दुसऱ्या बाजूला काम पूर्ण झाल्याचे त्यांना समाधान देखील आहे आणि इतके दिवस एकत्र राहिल्याने थोडा भावनिक देखील झालो आहे. या चित्रपटामध्ये मी पोलिसाची भूमिका साकारत आहे. सयाजी शिंदे या सारख्या अष्टपैलू अभिनेत्या सोबत काम करताना खूप आनंद आणि मज्जा देखील आली. आकाश सोबत मी या अगोदर देखील काम केले आहे आणि तो उत्तम कलाकार देखील आहे. आणि घर बंदुक बिर्याणी या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. आणि आम्ही या चित्रपटाची लवकरच तारीख जाहीर करणार आहोत.

 

हे ही वाचा :

छोल्यांपासून बनवा चविष्ट मसाले पकोडे

 

Exit mobile version