Sunday, June 30, 2024

Latest Posts

Manisha Koirala प्रकरणावर नाना पाटेकटरांनी अखेर मौन सोडले..

संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडी (Heeramandi) आणि मनीषाच्या अभिनयाने प्रभावित झालो असल्याचे नाना पाटेकर म्हणाले. मात्र, मनीषाचा लेटेस्ट नंबर त्यांच्याकडे नसल्याने त्यांनी सांगितले. त्यामुळे ते स्वत: अभिनेत्रीला हे सांगू शकत नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. 

नाना पाटेकर (Nana Patekar) आणि मनीषा कोइराला (Manisha Koirala) एकेकाळीची हि प्रचंड गाजलेली अशी जोडी. आपली प्रेमकथा एखाद्या चित्रपटातील प्रेमकथेप्रमाणेच असावी असे प्रत्येकाला वाटत असतं. पण पडद्यावर दिसणारी प्रेमकथा ही स्क्रिप्टेड असते हेही तितकेच खरे.

मात्र काहीवेळेस पडद्यावर प्रेमकहाणी साकारताना पडद्याआड एक वेगळीच प्रेमकहाणी सुरु झालेली असते. काही वेळेस ती पूर्णत्वास येते तर काहीवेळेला अर्ध्यातच मोडते. सिनेसृष्टीत अशा कित्येक कलाकारांच्या प्रेमकहाण्या ऐकायला आणि पाहायला मिळतात ज्याची सुरुवात तर भन्नाट होते, पण शेवट तितकाच वाईट असतो. आज आम्ही तुम्हाला नाना पाटेकर आणि अभिनेत्री मनीषा कोईराला यांची प्रेमकहाणी सांगणार आहोत. जिथे प्रेम झालं ते स्वीकारलंही गेलं. एवढंच नाही तर जगासमोरही त्यांनी खुलेआम मान्यही केलं, पण तरीही त्याचा शेवट काही फारसा चांगला झाला नाही.

हा विषय आता चर्चेला येण्याचे कारण म्हणजे मनीषा कोईराला यांचा आलेला नवा चित्रपट हिरामंडी हा होय. नाना पाटेकर व मनीषा हे दोघे नव्वदीच्या दशकात रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर काही काळाने त्यांचे ब्रेकअपसुद्धा झालं होते. अनेक वर्षांनंतर, नानांनी आपल्या मैत्रिणीबद्दल जाहीर भाष्य केलं आहे. नाना पाटेकर यांनी मनीषा कोईरालाच्या हिरामंडीमधील अभिनयाचे कौतुक केले. संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडी (Heeramandi) आणि मनीषाच्या अभिनयाने प्रभावित झालो असल्याचे नाना पाटेकर म्हणाले. मात्र, मनीषाचा लेटेस्ट नंबर त्यांच्याकडे नसल्याने त्यांनी सांगितले. त्यामुळे ते स्वत: अभिनेत्रीला हे सांगू शकत नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

संजय लीला भन्साळी (Snanjay Lila Bhnsali) दिग्दर्शित ‘हिरामंडी’ ही मालिका मे महिन्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. या वेब शोमध्ये मनीषाने मल्लिका जानची भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयाला समीक्षक आणि चाहत्यांनी भरभरून दाद दिली. ‘द ललनटॉप’शी बोलताना नानांनी मनीषाला ‘उत्कृष्ट अभिनेत्री’ म्हटले आणि ‘तिने खूप चांगले काम केलं.’ असल्याचे नमूद केले. शोसाठी तिचे अभिनंदन करण्यासाठी मनीषा कोईरालाशी संपर्क साधला होता का असे विचारले असता? म्हणून नाना काही सेकंद थांबले आणि म्हणाले, मनीषाचा लेटेस्ट नंबर नाही.

“नाना आणि मनीषा यांनी १९९६ मध्ये ‘अग्नी साक्षी’मध्ये (Agnisakshi) काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते रिलेशनशिपमध्ये आल्याचे सांगण्यात येते. त्यावेळी मनीषाचे विवेक मुशरनसोबत ब्रेकअप झाले होते आणि ती नानांच्या प्रेमात पडली होती. नानांनी आधीच नीलकांतीशी लग्न केले होते. मनीषासोबत अफेअर सुरू असताना ते पत्नीपासून वेगळे राहत होते. दरम्यान, नानांनी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरुख खान (Sharuk Khan) आणि इतरांबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आणि त्यांचे अनुभव कथन केले. या यादीत मनीषा कोईरालाचेही नाव होते. मनीषाच्या नावावर प्रतिक्रिया देताना नाना म्हणाले, ‘महान अभिनेत्री’. कॅन्सरमुळे लहान वयातच खूप काही सहन करावं लागलं ही दुर्दैवाची गोष्ट आहे.” असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

हे ही वाचा

महिलांसाठी खुशखबर ! राज्यात येणार ‘ही’ नवी योजना.. 

चोपडा बस स्थानकाने पटकावला स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा किताब..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss