National Cinema Day : अवघ्या ७५ रूपयांत चित्रपटाचे तिकीट; असं बुक करा तिकीट

राष्ट्रीय चित्रपट दिन (National Film Day) दि २३ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी चित्रपटांच्या तिकिटांची किंमत अवघे ७५ रुपये ठेवण्यात आली आहे.

National Cinema Day : अवघ्या ७५ रूपयांत चित्रपटाचे तिकीट; असं बुक करा तिकीट

राष्ट्रीय चित्रपट दिन (National Film Day) दि २३ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी चित्रपटांच्या तिकिटांची किंमत अवघे ७५ रुपये ठेवण्यात आली आहे. यामुळे ३०० ते १००० रुपयांचे तिकीट काढून चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना अवघ्या ७५ रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे. केवळ ॲमॅझॉन (Amazon) व फ्लिपकार्टवरच (Flipkart) नाही तर सिनेमागृहातही बंपर सेल आहे.

२३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने प्रेक्षकांना भेटवस्तू देताना चित्रपटांच्या तिकिटांची किंमत केवळ ७५ रुपये ठेवण्यात आली आहे. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त ट्विट केले आहे की, भारताच्या पहिल्या राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त भारतभरातील सर्व सहयोगी सिनेमागृहांमध्ये (Theaters) फक्त ७५ रुपयांमध्ये चित्रपटांचा आनंद घ्या.

राष्ट्रीय चित्रपट दिनी ७५ रुपयांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी ऑनलाइन पद्धतीनं तिकीट बुक करायचं असेल तर तुम्ही या सोप्या स्टेप्स फॉलो करु शकता-

स्टेप १: सर्वप्रथम पीवीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस या वेबसाइट्स ऑपन करा.
स्टेप २: त्या साइट्सवर लॉग-इन करा.
स्टेप ३: त्यानंतर सिटी आणि एरिरा सिलेक्ट करुन थिएटर निवडा.
स्टेप ४: जो चित्रपट बघायचा आहे, तो सिलेक्ट करा.
स्टेप ५: त्यानंतर सर्वात शेवटी वेळ सिलेक्ट करा. वेळ सिलेक्ट केल्यानंतर ऑनलाइन पेमेंट करुन प्रोसेस पूर्ण करा. त्यानंतर तुमचं तिकीट बुक होईल.

जर थर्ड पार्टी अँपमधून तिकीट बुक केले तर जास्त पैसे भरावे लागतील. बुक माय शो सारख्या प्लॅटफॉर्मवरुन तिकीट बुक केल्यानंतर देखील अँँडशनल चार्जेस भरावे लागतील. कारण या अँपमधून तिकीट बुक करताना तुम्हाला जीएसटी आणि इंटरनेट चार्ज भरावा लागतो.

‘केजीएफ चॅप्टर 2’, ‘आरआरआर’, ‘विक्रम’ हे दाक्षिणात्य चित्रपट, ‘भूल भुलैया 2′ हा बॉलिवूड चित्रपट आणि डॉक्टर स्ट्रेंज आणि टॉप गन : मेवरिक’ हे हॉलिवूड चित्रपट सिनेप्रेमींना ७५ रुपयांमध्ये बघता येणार आहेत. त्यामुळे आता प्रेक्षक राष्ट्रीय चित्रपट दिनाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. गेल्या काही दिवसांत या सिनेमांनी सिनेमागृहात धुमाकूळ घालत बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे.

 

हे ही वाचा:

इन्फोसिसनंतर विप्रोने घेतली ‘मूनलायटिंग’ विरुद्ध ऍक्शन, केले ३०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी

Dasara Melava : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मुहूर्त मिळेना, हायकोर्टाची सुनावणी लांबणीवर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version