राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या निमिताने,’चूप’ चित्रपटाच्या ओपनिंग डेला केली इतकी कमाई

राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या निमिताने,’चूप’ चित्रपटाच्या ओपनिंग डेला केली इतकी कमाई

आर बाल्की दिग्दर्शित ‘चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’ हा चित्रपट काल म्हणचेच २३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. सनी देओल, दुल्कर सलमान, पूजा भट्ट या कलाकारांच्या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाची चांगली ओपनिंग झाली आहे, याचे श्रेय राष्ट्रीय चित्रपट दिनाला जाते. सिनेप्रेमींसाठी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ नंतर ‘चूप’ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त चित्रपटाची तिकिटे ७५ रुपये ठेवण्यात आली होती, त्याचा परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शनवर दिसून आला. ‘चुप’ चित्रपटातून सनी देओल दीर्घ काळानंतर रुपेरी पडद्यावर परतला आहे. बॉलीवूड हंगामाच्या अहवालानुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी२.६० ते ३.२० कोटींचा गल्ला जमवला आहे.

हेही वाचा : 

Airtel Users : दिवाळी आधीच एअरटेलचा धमाका, ‘या’ प्लॅनसह मोफत डिस्ने प्लस व हॉटस्टार सबस्क्रिप्शन

आगाऊ बुकिंगने रिलीज होण्यापूर्वीच चित्रपट निर्मात्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणला होता. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्या अहवालानुसार २२ सप्टेंबरलाच १ लाख २५ हजार तिकीट बुकिंग झाले होते. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी ४ लाख तिकिटांची विक्री झाली. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. तिकीट दरात कपात केली नसती तर कदाचित या चित्रपटाने कोटींचा आकडाही ओलांडला नसता.

अग्निहोत्रींचं ट्वीट चर्चेत- दुश्मन आपल्या आजुबाजूलाच आहे, हिंदू सण तोंडावर आणि संकट ….

आर बाल्की यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या ‘चुप’मध्ये अमिताभ बच्चनची धून आहे, शतकातील मेगास्टार अमिताभ बच्चन यांची धून तयार करण्यासाठी ‘चुप’चा वापर करण्यात आला आहे . चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले की, एक मधुर धून मी संगीतबद्ध केली आहे. आशा आहे की उद्या संध्याकाळपर्यंत तुमच्याकडे या ट्यूनची एक छोटीशी कथा असेल.

म्हात्रेताई, मिंधे गटाला खूश करण्यासाठी फोटो टाकला काय? – रुपाली पाटील

‘चुप’ चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाच्या क्रेडिट स्कोअरवर पियानोवर स्वतःची धून दिली आहे. या चित्रपटाची कथा स्वतः आर.बाल्की यांनी लिहिली आहे, तर संगीत अमित त्रिवेदी यांनी दिले आहे. होप प्रॉडक्शन आणि राकेश झुनशुनवाला, प्रणव कपाडिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Exit mobile version