spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Navaratri Special Exclusive, ‘टाईम महाराष्ट्र’सोबत अभिनेत्री स्नेहल शिदमने घेतले दादरच्या भवानी मातेचे दर्शन, म्हणाली…

संपूर्ण महाराहाष्ट्रातील नागरिकांना पोट धरून हसवणारी आणि चला हवा येउ द्या कार्यक्रमातील अभिनेत्री स्नेहल शिदम हिने दादरची भवानी माता या देवीचे दर्शन घेतले आहे.

Navaratri 2023: शारदीय नवरात्र उत्सवाला (Shardiya Navratri 2023) कालपासून (रविवार) सुरुवात झाली. या नवरात्र (Navratri 2023) उत्सवात देवीच्या विविध रूपांची नऊ दिवस पूजा केली जाते. पहिल्या दिवशी देवीच्या शैलपुत्री रूपाची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते. या नवरात्री निम्मित टाईम महाराष्ट्र तर्फे ‘दुर्गोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज नवरात्रीची दुसरी माळ. यावेळी संपूर्ण महाराहाष्ट्रातील नागरिकांना पोट धरून हसवणारी आणि चला हवा येउ द्या कार्यक्रमातील अभिनेत्री स्नेहल शिदम हिने दादरची भवानी माता या देवीचे दर्शन घेतले आहे. मुंबईतले पहिले नवरात्र मंडळ म्हणून दादरची भवानी माता या देवीला ओळखले जाते. तर यंदाचे वर्ष हे त्यांचं ८८ वे वर्ष आहे.

दधाना करपदमाभ्यामक्षमालाकमंडलू।
देवी प्रसिदतु मयि ब्रम्हाचारिण्यनुमत्तमा।।

नवशक्तीपैकी ‘ब्रम्हचारिणी’ हे दुर्गेच्या दुसरे रूप आहे. येथे ‘ब्रह्म’ या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रम्हाचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. नवरात्राच्या दुसर्‍या दिवशी या मातेची पूजा केली जाते. या‍ दिवशी साधकाचे मन ‘स्वाधिष्ठान’ चक्रात स्थिर होते. या चक्रात मन स्थिर करणार्‍याला तिची कृपा आणि भक्ती प्राप्त होते. या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे. यावेळी स्नेहल सोबत गप्पा मारत असताना स्नेहलने अनेक किस्से हे सांगितले आहेत. नवरात्रीच्या काही जुन्या आठवणी देखील स्नेहल नि आपल्या सोबत शेअर केल्या आहेत.

तसेच यावेळेस संवाद असताना स्नेहल सोबत एक मजेशीर प्रश्नमंजुषाचा खेळ देखील खेळण्यात आला. यावेळी सर्वात आधी स्नेहलला नवरात्र वर्षातून किती वेळा येते? हा प्रश्न विचारण्यात आला तर या संदर्भात मात्र तिला उत्तर माहित न्हवते. पण जेव्हा तेथील गुरुजींनी उत्तर सांगितले तेव्हा काही तरी नवीन शिकायला मिळाल किंवा नवीन गोष्ट समजली याचा आनंद स्नेहल च्या चेहऱ्यावर दिसून आला आहे. तसेच तेथील सजावट बघून देखील स्नेहल ने खूप उत्तर दिली. कारण तेथील सजावटीत देखील अनेक उत्तर ही दडलेली होते. तसेच यावेळी स्नेहल ने देवीचं खूप भरभरून कवतुक हे केले आहे. पुढे स्नेहल म्हणाली मला जेव्हा थकल्या सारखं वाटतं, किंवा मी नाराज असते तेव्हा मी देवीला हाक मारते ऐक देवी असं म्हणते आणि तेव्हा माझंही प्रश्न हे नक्कीच सुटतात. मी या आधी इथे खूप वेळा आली आहे पण तेव्हा मला कोणी ओळखलं नसेल पण आज मी आली तर लोक अगदी जवळ येऊन बोलतात छान संवाद साधतात तर खूप छान वाटत आहे.

हे ही वाचा : 

सोन्याच्या दरात घसरण, पहा आजचा दर

शिवानी रांगोळेने मराठमोळ्या अंदाजात शेअर केला जेजुरीच्या खंडोबा मंदिरातील फोटो

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss