spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“नवरा माझा नवसाचा २” झळकतोय पॅकेज्ड मिनरल वॉटरच्या बॉटलवर

"नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. चित्रपटाची गाणी, टीजर, ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यात आता या चित्रपटाला अनोखा मान मिळाला आहे.

“नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. चित्रपटाची गाणी, टीजर, ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यात आता या चित्रपटाला अनोखा मान मिळाला आहे. हा चित्रपट आता सुप्रसिद्ध अशा पॅकेज्ड मिनरल वॉटरच्या बॉटलवर झळकत असून याची चर्चा चांगलीच रंगली आहे. “नवरा माझा नवसाचा 2” हा चित्रपट येत्या २० सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.

सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक नवनव्या क्लृप्त्या लढवल्या जातात. त्यात आता पॅकेज्ड मिनरल वॉटरच्या पॅकेजिंगवर झळकणं हा नवाच प्रकार आहे. मराठी चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले असून तो मान “नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाला मिळाला आहे आणि ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. “नवरा माझा नवसाचा 2” मध्ये स्वप्नील जोशी-हेमल इंगळे ही जोडी सचिन-सुप्रिया पिळगांवकर यांची जावई, मुलगी अशा भूमिकेत दिसणार आहे. सासऱ्यांनी ज्याप्रमाणे धडपड करून नवस फेडला, तसा आता जावयाला फेडता येतो का ? याची धमाल गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, अली असगर, विजय पाटकर, जयवंत वाडकर, संतोष पवार, हरिश दुधाडे,गणेश पवार अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून भेटीस येणार आहे. त्याशिवाय हिंदीतील ज्येष्ठ अभिनेते लिलीपुट या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. कॅमेरामन म्हणून पराग देशमुख आणि नितीनचंद्र बांदेकर यांनी काम पाहिले आहे. वैभव जोशी, प्रवीण दवणे, अवधूत गुप्ते, संतोष पवार यांनी लिहिलेल्या गीतांना अवधूत गुप्ते, जितेंद्र कुलकर्णी, रविराज कोलथरकर यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, सचिन पिळगांवकर, आदर्श शिंदे, जान्हवी प्रभु अरोरा, विभावरी जोशी, सिद्धार्थ जाधव यांच्या दमदार आवाजात चित्रपटातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. दीपाली विचारे, सॅड्रिक डिसोझा, अजिंक्य शिंदे यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.

हे ही वाचा:

कोण होणार Mahavikas Aghadi चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? Sharad Pawar यांचे मोठे वक्तव्य

Aaditya Thackeray तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलात, तुम्हाला शेती माहित नाही: Dhananjay Munde

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss