‘नवरा माझा नवसाचा २’ ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई; तीन दिवसांत इतक्या रुपयांचे कलेक्शन

‘नवरा माझा नवसाचा २’ ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई; तीन दिवसांत इतक्या रुपयांचे कलेक्शन

‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होताच सर्व प्रेक्षकांना अतिशय उत्सुकता लागली होती. २००५ साली म्हणजेच १९ वर्षांपूर्वी आलेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ सिनेमाने प्रेक्षकांवर जादू केली होती. त्याचबरोबर आता ‘नवरा माझा नवसाचा २’ या नव्या सिनेमानेही प्रेक्षकांनी तितकाच प्रतिसाद दिला आहे. सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्निल जोशी, अशोक सराफ, सिद्धार्थ जाधव, निर्मिती सावंत, वैभव मांगले, हेमल इंगळे (Sachin Pilgaonkar, Supriya Pilgaonkar, Swapnil Joshi, Ashok Saraf, Siddharth Jadhav, Nirvana Sawant, Vaibhav Mangle, Hemal Ingle) अशी दमदार स्टारकास्ट सिनेमात आहे.

सुश्रिया चित्र (Sushriya Chitra) या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची निर्मिती, कथा,पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. तसेच ६०० पेक्षा अधिक शो हाऊसफुल होते. पहिल्याच वीकेंडला ‘नवरा माझा नवसाचा २’ या सिनेमाने ७. ८४ कोटी रुपयांची कमाई केली. प्रेक्षकांना या चित्रपटाची अतिशय उत्सुकता होती.

पहिल्या आणि दुसऱ्या भागावर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला. नवस फेडण्यासाठी जाणाऱ्या रेल्वे प्रवासातील होणाऱ्या गंमती-जमती यावर आधारित या सिनेमाचे कथानक आहे. सोनू निगम, जॉनी लिवर, श्रिया पिळगांवकर हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत या सिनेमात प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. पाहुण्या कलाकारांच्या भूमिकांवरही चाहते खुश झाले आहेत.‘नवरा माझा नवसाचा २’ या सिनेमात सचिन व सुप्रिया पिळगांवकर यांच्या जावई आणि लेकीच्या भूमिकेत स्वप्नील जोशी आणि हेमल इंगळे ही जोडी दिसत आहे. त्याचमुळे या चित्रपटाची असलेली चाहत्यांची उत्सुकता चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईवरून सहज समजत आहे.

हे ही वाचा:

वरळीत तीन आमदार मात्र झिरो विकास! Shrikant Shinde यांची उबाठावर घणाघाती टीका

Devendra Fadnavis on Koli Bhavan: आपले सरकार कोळी बांधवाच्या बाजूने खंबीरपणे उभे, Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version