Navra Maza Navsacha 2 | ‘चित्रपट खरंच खूप वाईट…’, मराठी अभिनेता ध्रुव दातारने मांडले स्पष्ट मत

‘नवरा माझा नवसाचा २’ने ( Navra Maza Navsacha 2 ) आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली असली तरीही, चित्रपटाला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

Navra Maza Navsacha 2 | ‘चित्रपट खरंच खूप वाईट…’, मराठी अभिनेता ध्रुव दातारने मांडले स्पष्ट मत

नवरा माझा नवसाचा’ हा मराठीतील एव्हरग्रीन सिनेमांपैकी एक आहे. २००४ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. ‘नवरा माझा नवसाचा’ सिनेमातील गाणीही प्रचंड हिट ठरली होती. ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाने प्रेक्षकांना वेडे केले होते. या चित्रपटातील कथा, संवाद आणि कलाकारांचा अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. या चित्रपटातील कॉमेडी पाहून चाहते खळखळून हसले. प्रत्येक कलाकारांनी या चित्रपटामध्ये आपली भूमिका उत्कृष्ट बजावली होती. तर एसटीमधल्या सगळ्या कलाकारांनी प्रेक्षकांना भरपूर हसवले. आता तब्बल १९ वर्षांनंतर या सिनेमाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची घोषणा केल्यापासून सर्व प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाचा दुसरा भाग देखील आपल्या सर्वांच्या भेटीस आला आहे. दुसऱ्या भागाने देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपटाने पहिल्याच वीकेंडला ७.८ कोटींची कमाई केली आहे. ‘नवरा माझा नवसाचा २’ने ( Navra Maza Navsacha 2 ) आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली असली तरीही, चित्रपटाला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. सोशल मीडियावर काही प्रेक्षकांना चित्रपट आवडलं नसल्याचं बोललं जात आहे. याबाबत एका मराठी अभिनेत्याने पोस्ट शेअर करत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता ध्रुव दातारने यासंदर्भात इन्स्टाग्राम स्टोरी व व्हिडीओ शेअर करत आपलं मत मांडलं आहे. सुरुवातीला चित्रपटात पाहतानाची एक स्टोरी टाकून ध्रुवने त्यावर “खरंच खूप वाईट चित्रपट आहे” असं लिहिलं होतं. यानंतर अभिनेत्याला अनेकांनी मेसेज करून “तू मराठी कलाकार आहेस अशा स्टोरी टाकू नकोस” असा सल्ला दिला. मात्र, यावर त्याने व्हिडीओ शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे. ध्रुव सांगतो, “‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाबद्दल मी एक स्टोरी टाकली होती. त्यात मी खूप वाईट चित्रपट आहे असं लिहिलं होतं. त्यानंतर मला बऱ्याच लोकांचे मेसेज आले की, तू एक मराठी कलाकार आहेस आणि तू असं नाही बोललं पाहिजेस. अरे पण, मी का बोलू नये? मी फक्त माझं मत मांडलं. मला तो चित्रपट अजिबात आवडला नाही. मी चांगल्या गोष्टीचं नेहमीच कौतुक करतो आणि तो सिनेमा चांगला असता, तर मी नक्कीच कौतुक केलं असतं. पण, तो चित्रपट खरंच खूप वाईट आहे.” “मी मराठी अभिनेता आहे म्हणून मी उगाच कौतुक करू का? सॉरी पण, मी असं करू शकत नाही. सचिन सर आणि सुप्रिया मॅमचा प्रश्नच नाहीये. ते छानच आहेत पण, मला स्टोरीलाइन अजिबात आवडली नाही.” असं मत अभिनेत्याने ( Navra Maza Navsacha 2 ) मांडलं आहे.

चित्रपटाची कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहे.

हे ही वाचा:

घटस्फोटाची घोषणा करत HARDIK PANDYA यांनी केले चाहत्यांना आवाहन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version